यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेत दत्तक घेतलेली सेलिब्रिटींची ही मुले, कोणी एअर हॉस्टेस तर कोणी फॅशन डिझायनर

रस्त्यावर रडत असलेल्या मुलीला 'या' सेलिब्रिटीने दिलं वडिलांचं प्रेम, ती मुलगी आज आहे प्रसिद्ध फॅशन डिझायनर... सेलिब्रिटींच्या दत्तक मुलांची गगन भरारी...

यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेत दत्तक घेतलेली सेलिब्रिटींची ही मुले, कोणी एअर हॉस्टेस तर कोणी फॅशन डिझायनर
| Updated on: Apr 26, 2023 | 1:11 PM

मुंबई : बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असतात. काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी मुलं दत्तक घेतली आणि त्यांचा स्वतःच्या बाळाप्रमाणे सांभाळ केला. काही सेलिब्रिटींनी कचऱ्याच्या ठिगाऱ्यात पडलेल्या मुलीला स्वतःचं नाव दिलं, तर एका सेलिब्रिटीने रस्त्यावर रडत असलेल्या मुलीला वडिलांचं प्रेम दिल. आज याच सेलिब्रिटींनी दत्तक घेतलेली मुले यशाच्या उंच शिखरावर पोहोचले आहेत… आज सेलिब्रिटींच्या दत्तक मुलांबद्दल जाणून घेवू…

दिशानी चक्रवर्ती (Disha Chakraborty) | दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मुलगी दिशानी हिला कचऱ्याच्या ठिगाऱ्यातून आणलं होतं. त्यानंतर मिथुन यांनी त्या मुलीला स्वतःचं नाव दिलं. दिशानी हिने न्ययॉर्क येथील फिल्म ऍकडमी मधून फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं. दिशानी हिला अभिनयात रस आहे आणि दिशानी हिने दोन शॉर्ट फिल्ममध्ये काम देखील केलं आहे.

रेने सेन (Renee Sen) | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिने एका गोंडस मुलीला दत्तक घेतलं आणि तिचं नाव रेने सेन असं ठेवलं. रेने हिला अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. २२ वर्षीय रेने हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिने २०२० साली प्रदर्शित झालेल्या ‘सुट्टाबाजी’ सिनेमात काम केलं आहे. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+हॉटस्टार उपस्थित आहे.

अर्पिता खान (Arpita Khan) | खान कुटुंबाची लाडकी लेक म्हणजे अर्पिता खान… सलमान खान याची लाडकी बहीण अर्पिता खान आज अभिनेत्री नसली तरी, प्रचंड प्रसिद्ध आहे. भाईजान याचे वडील सलीन यान यांनी रस्त्यावर रडत असलेल्या अर्पिताला घरी आणलं आणि स्वतःच्या लेकीप्रमाणे तिचा सांभाळ केला. अर्पिता एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट आहे.

मेघना घई (Meghna Ghai) | सुभाष घई यांनी त्यांच्या भावाची मुलगी मेघना हिला दत्तक घेतलं. त्यांनी मेघनाला मीडिया आणि पापाराझींपासून नेहमीच दूर ठेवलं. मेघना घई पुरी या मुंबईतील व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षा आहेत.

छाया टंडन (Chaya Tandon)  | अभिनेत्री रवीना टंडन हिने वयाच्या २१ व्या वर्षी छायाला दत्तक घेतलं. रवीनाच्या दत्तक मुलीचं लग्न झालं आहे. पण छाया एक एअर होस्टेस आहे. रवीना हिच्यासोबत छायाचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.