AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : पती, पत्नी और वो…सुनीतासारखं ज्या मुलीचं नाव घ्यायची तिचे आणि गोविंदाचे फोटो, व्हिडिओ आले समोर

Govinda : अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आता देखील गोविंदा याचे एका महिलेसोबत काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

Govinda :  पती, पत्नी और वो...सुनीतासारखं ज्या मुलीचं नाव घ्यायची तिचे आणि गोविंदाचे फोटो, व्हिडिओ आले समोर
अभिनेता गोविंदा
| Updated on: Aug 08, 2026 | 10:22 AM
Share

Govinda : अभिनेता गोविंदा याने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. 1990 च्या दशकातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत गोविंदा अव्वल स्थानी होता. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा मोठ्या पडद्यापासून तर दूर होता, पण खासगी आयुष्यामुळे सर्वत्र चर्चेत होता बायको सुनीता अहुजा हिने गोविंदाचे अफेअर्स असल्याचा देखील खुलासा केलेला. त्यानंतर विमानतळावर गोविंदाला एका कोमल नावाच्या अभिनेत्रीसोबत स्पॉट करण्यात आलं. सांगायचं झालं तर, एका मुलाखतीत, सुनीता हिने ‘कोमल नावाचा तिरस्कार आहे..’ असं म्हणालेली.

मुंबई विमानतळावर अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत दिसल्यामुळे गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि ‘डेटिंग’च्या चर्चांमुळे चर्चेत आला आहे. पापाराझींनी या दोघांचे एकत्र अनेक फोटो काढले असून ते आता सोशल मीडियावर समोर आले आहेत; विमानतळावरील या फोटोंमध्ये अभिनेत्याला तिच्यासोबत पाहता येते आहे.

4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत गोविंदा आणि कोमल?

सोशल मीडियावर गोविंदा आणि कोमल यांचे फोटो व्हायरल होताच, चाहत्यांनी अभिनेत्याचं नाव त्या ‘कोमल’शी जोडत आहेत जिच्याशी या अभिनेत्याचं यापूर्वीही नाव जोडलं गेलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, गोविंदा आणि कोमल गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांनी उत्तराखंडमधील एका कार्यक्रमालाही एकत्र हजेरी लावली होती. हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा आणि तर्क-वितर्क लावले जात आहेत.

‘मला कोलम नावाचा तिरस्कार…’

सुनीता अहुजा हिने एका मुलाखतीत ‘कोमल’ नावाचा उल्लेख केलेला. यावर पुन्हा एका मुलाखतीत कोमल कोण आहे? असा प्रश्न गोविंदाच्या बायकोला विचारण्यात आलेला. यावर सुनीता म्हणालेली, ‘मला या नावाचा तिरस्कार आहे… एक मुलगी आहे कोमल… कोणी XYZ.. मला तिचा तिरस्कार आहे… ‘, अखेरीस सुनीता असं देखील म्हणालेली की, ‘माझ्या हाती कोणते पुरावे आले तर, मी गोविंदाला कधीच माफ करणार नाही…’

कोण आहे कोमर राणी स्वर्णकार?

उत्तर प्रदेशातील कोमल राणी स्वर्णकार ही ग्लॅमर विश्वातील एक उभरती अभिनेत्री आहे. ती ‘रूपा’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली असून, खुद्द गोविंदा या सिनेमाद्वारे तिला या क्षेत्रात संधी देत ​​आहेत. ‘रूपा’ सिनेमाच्या घोषणेसाठी आयोजित पत्रकार परिषदेत गोविंदा यांनी तिचं कौतुक करताना म्हणाला, “मी देवाकडे प्रार्थना करतो आणि अशी आशा बाळगतो की, तुझ्यासोबतही (राणी स्वर्णकार) मी किमान अर्धा डझन हिट सिनेमे देईन.”, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय