ठरलेल्या बोलांमध्ये फक्त एका शब्दाचा बदल अन् लतादीदींच्या आवाजात अजरामर झालं मराठी गाणं 

मराठी गाण्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. नवी असो वा जुनी मराठी गाणी आजही प्रेक्षकांच्या आणि चोखंदळ श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतात, मराठी गाणी आणि मंगेशकर कुटुंब हे एक अतूट नातं आहे. आज आपण भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अतिशय लोकप्रिय मराठी गाण्याचा किस्सा जाणून घेऊयात...

ठरलेल्या बोलांमध्ये फक्त एका शब्दाचा बदल अन् लतादीदींच्या आवाजात अजरामर झालं मराठी गाणं 
Lata mangeshkar popular marathi song
Image Credit source: social media
| Updated on: Oct 31, 2026 | 10:58 PM

मराठी संगीतसृष्टीत काही गाणी अशी आहेत, जी केवळ ऐकली जात नाहीत तर थेट काळजाचा ठाव घेतात. त्या गाण्यांमागील प्रत्येक शब्द आणि किस्सा रसिकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिला आहे. लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात रेकॉर्ड झालेले आणि १९६५ च्या ‘साधी माणसं’ चित्रपटातील ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे’ हे गाणं म्हणजेच असाच एक सुवर्ण अध्याय आहे. आजही हे गाणं कानावर पडलं की अंगावर शहारे येतात. पण तुम्हाला ठाऊक आहे का, या अजरामर गाण्यातील एक मुख्य शब्द सुरुवातीला काहीसा वेगळाच होता.

शाळेतून थेट स्टुडिओत

या गाण्याचे अजरामर शब्द गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिले होते. त्या काळी ते एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. एकदा शाळा सुरू असतानाच मुख्याध्यापकांकडे त्यांचा निरोप आला. चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते-दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा तो फोन होता. त्यांनी खेबुडकरांना तातडीने स्टुडिओत हजर राहण्याची सूचना केली. भालजींनी चित्रपटाची कथा आणि लोहाराच्या कष्टाळू अन् स्वाभिमानी जीवनाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. विशेष म्हणजे, कथा ऐकत असतानाच खेबुडकरांच्या डोक्यात गाण्याच्या ओळी सुचू लागल्या आणि त्यांनी तिथेच कागदावर त्या उतरवल्या.

Loading...

‘आगिनफुले’ ऐवजी आला ‘ठिणगी’चा जादूई शब्द

या गाण्याच्या सुरुवातीच्या मसुद्यात ‘ऐरणीच्या देवा तुला आगिनफुले वाहू दे’ असे शब्द होते. परंतु, नंतर त्यात योग्य फेरबदल करत ‘ठिणगी ठिणगी’ असा बदल करण्यात आला. या एका छोट्याशा बदलाने गाण्याला अफाट ताकद मिळवून दिली. लोहाराच्या हातातील हातोडा, भट्टीचा अन् संघर्षाचा बाज या शब्दांतून जिवंत झाला.

आनंदघन संगीत अ्न लतादीदींचा आवाज

या गाण्याला केवळ शब्दच भारी लाभले नाहीत, तर खुद्द स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ‘आनंदघन’ या टोपणनावाने या गाण्याला दिलेले संगीत आणि स्वतःचा आवाज यामुळे हे गाणं थेट इतिहासात अजरामर झाले. कष्टाळू माणसाचा स्वाभिमान सांगणारे हे गीत आजही स्मरणात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us