AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishawarya Rai : ऐश्वर्या रायच्या फॅमिली सेलिब्रेशनची चर्चा ! लेक आराध्यासोबत ब्लू लूकमध्ये दिसली अभिनेत्री

ऐश्वर्या राय नुकतीच तिची लेक आराध्या बच्चनसह , भाच्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला पोहोचली. माय-लेकीच्या जोडीने ट्विनिंग केलं होतं. दोघींचे काही फोटोही समोर आले आहेत.

Aishawarya Rai : ऐश्वर्या रायच्या फॅमिली सेलिब्रेशनची चर्चा ! लेक आराध्यासोबत ब्लू लूकमध्ये दिसली अभिनेत्री
| Updated on: Oct 24, 2026 | 4:20 PM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. गेल्या काही काळापासून ती मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. तिच्या आयुष्याशी निगडीत अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. याच दरम्यान ऐश्वर्या राय आणि तिची लेक आराध्या हिचे काही फोटो समोर आले आहेत. त्या दोघी ऐश्वर्याचा भाचा, शिवांशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी गेल्या होत्या. त्याचेच काही फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत.

ऐश्वर्याचे घरच्यांसह फोटो समोर

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या तिच्या एका खास कौटुंबिक भेटीमुळे चर्चेत आली आहे. ऐश्वर्या नुकतीच मुलगी आराध्या बच्चनसोबत तिच्या भाचा शिवांश राय याच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचली होती. या खास सोहळ्यात ऐश्वर्या तिच्या कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसली. ऐश्वर्याची वहिनी श्रीमा राय हिने सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या, आराध्या, भाऊ आदित्य राय, आई वृंदा राय, वहिनी श्रीमा आणि भाचा शिवांश एकत्र दिसत आहेत.

श्रीमा राय हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये बच्चन कुटुंबातील ऐश्वर्या राय बच्चन तिच्या माहेरच्या मंडळींसोबत आनंदात वेळ घालवताना दिसत आहे. एका फोटोमध्ये संपूर्ण कुटुंब टेबलाभोवती एकत्र बसलेलं दिसतं. टेबलावर चॉकलेट केक ठेवण्यात आला होता. त्याशिवाय गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या फुलांचा मोठा गुच्छही लक्ष वेधून घेत आहे. हा गुच्छ निळ्या रंगाच्या कागदात गुंडाळलेला असून त्याला गडद गुलाबी रंगाची रिबन बांधलेली होती. खोलीच्या भिंतींवर कुटुंबीयांचे फोटो फ्रेम करून लावलेले दिसले. या खास प्रसंगी ऐश्वर्या कॅमेऱ्यासमोर हसत पोझ देताना दिसली. तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुटुंबीयांसोबतचे हे खास क्षण चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

फोटो शेअर करताना श्रीमा राय हिने शिवांशसाठी खास शुभेच्छा लिहिल्या. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “ माझ्या लाडक्या शिवांश रायला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्या आयुष्यात अशाच आणखी खोड्या, निसर्गासोबत अधिक वेळ घालवणं, भरपूर हसणं आणि भरपूर आशीर्वाद मिळोत. मला तुझा खूप अभिमान वाटतो!” असं तिने लिहीलं .

View this post on Instagram

A post shared by Shrima Rai 🧿 (@shrimarai)

ऐश्वर्याने लेकीसह केलं ट्विनिंग

या सेलिब्रेशनमधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचा निळ्या रंगातील लूक. दोघींनीही वेगवेगळ्या स्टाइलचे कपडे परिधान केले होते; मात्र निळ्या रंगामुळे त्यांच्या लूकमध्ये छान साम्य पाहायला मिळाले. आई-मुलीची ही स्टाइल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्याने फिकट निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्यासोबत तिने गडद रंगाची बॉटम वेअर केली होती. तिने आपले केस मोकळे सोडले आणि डोक्यावर सनग्लासेस लावले होते. काळ्या रंगाची क्रॉस-बॉडी बॅग आणि गडद लाल रंगाची लिपस्टिक यामुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसत होता.

तर तिची लेक आराध्या बच्चन हीनेही आईसोबत ट्विनिंग केलं. आराध्याने निळ्या रंगाचे डेनिम जॅकेट परिधान केलं होतं. दोघींच्या कपड्यांची स्टाइल वेगळी असली, तरी निळ्या रंगाच्या निवडीमुळे त्यांचा लूक एकमेकांशी मिळताजुळता दिसत होता.

कोण आहे ऐश्वर्या राय बच्चनचा भाचा शिवांश राय?

शिवांश राय हा ऐश्वर्या राय बच्चनचा भाऊ आदित्य राय आणि त्याची पत्नी श्रीमा राय यांचा धाकटा मुलगा आहे. या दाम्पत्याला विहान राय नावाचा मोठा मुलगाही आहे. त्यामुळे विहान आणि शिवांश हे दोघेही आराध्या बच्चनचे मामेभाऊ आहेत. ऐश्वर्या राय बच्चन आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबीयांसोबत खास क्षण घालवताना दिसते. भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर झालेले हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेषतः ऐश्वर्या आणि आराध्याच्या निळ्या रंगातील लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं.

ऐश्वर्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या ती फिल्म्सपासून दूर असली तर अनेक इव्हेंट्समध्ये दिसते. काही दिवसांपूर्वीच ती पॅरिस फॅशन वीकमध्ये दिसली. तिथला तिचा रॅम्प वॉक खूप गाजला.

Follow Us
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ