करोडोंची मालकीण, ऐश्वर्या रायला फोटोशूटसाठी मिळाले फक्त 1500 रुपये; सलवार-सूटमध्ये दिसतेय खूपच सुंदर

अशी एक अभिनेत्री जिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1500 रुपयांच्या फोटोशूटने केली होती. आण आज ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत अभिनेत्री आहे. आजही ती तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

करोडोंची मालकीण, ऐश्वर्या रायला फोटोशूटसाठी मिळाले फक्त 1500 रुपये; सलवार-सूटमध्ये दिसतेय खूपच सुंदर
Aishwarya Rai Journey From 1500rs to India 2nd Richest Actress
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 25, 2025 | 8:33 PM

बॉलिवूडमध्ये अनेक अभनेत्री आहेत ज्यांनी स्वत:च्या मेहनतीने आणि कष्टाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. अशीच एक अभिनेत्री आहे जीने मॉडेल म्हणून सुरुवात केली होती. तसेच त्या दरम्यान तिला एका कामाच्या बदल्यात 1500 रुपये मिळाले होते आणि आज ती भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.

सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले

या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने तसेच आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय. 1994 मध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकून आपल्या देशाचे नाव उंचावलं. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच तिच्या नावावर एक मोठी कामगिरी होती. बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर ती देशात आणि जगात प्रसिद्ध झाली. खूप प्रसिद्धीसोबतच तिने खूप पैसेही कमावले. एकदा ऐश्वर्याला एका कामाच्या बदल्यात फक्त 1500 रुपये मिळाले होते.

फोटोशूटसाठी 1500 रुपये मिळाले

ऐश्वर्या रायने 1997 मध्ये तिने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पण त्याआधी ती मॉडेल म्हणून काम करत होती. तेव्हा तिला एका फोटोशूटसाठी 1500 रुपये मिळत होते. हे फोटोशूट तिने बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबत केलं होतं.


अभिनेत्री फक्त 18 वर्षांची होती 

जेव्हा हे फोटोशूट तिने केलं तेव्हा तेव्हा ऐश्वर्या 18 वर्षांची होती. त्यानंतर अभिनेत्रीने एका जाहिरात कंपनीसाठी फोटोशूट केले आणि त्या बदल्यात तिला खूप कमी पैसे मिळाले. तथापि, त्या काळानुसार ही रक्कम खूप मोठी होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ऐश्वर्या सलवार सूटमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये सोनाली बेंद्रे, निक्की अनेजा आणि तेजस्विनी कोल्हापुरी देखील आहेत.

आता भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत अभिनेत्री 

ऐश्वर्या रायला अभिनय क्षेत्रात आज 28 वर्षे झाली आहेत. 1997 मध्ये सुरू झालेला तिचा प्रवास अजूनही सुरूच आहे. एकामागून एक हिट चित्रपट देणारी ऐश्वर्या संपत्तीच्या बाबतीतही खूप पुढे आहे. ती केवळ बॉलिवूडमधीलच नाही तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. तिची एकूण संपत्ती 900 कोटी रुपये आहे. तर पहिल्या क्रमांकावर 90 च्या दशकातील अभिनेत्री जूही चावला आहे. तिची एकूण संपत्ती 4600 कोटी रुपये आहे