Aishwarya Rai: आराध्यामुळे ऐश्वर्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर; नेटकरी म्हणाले ‘मुलगी 11 वर्षांची होऊनसुद्धा..’

आराध्यावरून ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याच्या चाहत्यांनी दिलं सडेतोड उत्तर, 'तिची मुलगी, तिचा हात, तुमचं काय?'

Aishwarya Rai: आराध्यामुळे ऐश्वर्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर; नेटकरी म्हणाले मुलगी 11 वर्षांची होऊनसुद्धा..
Aishwarya Rai: आराध्यामुळे ऐश्वर्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 03, 2023 | 1:55 PM

मुंबई: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्यही प्रभावीपणे हाताळताना दिसते. उत्तम अभिनेत्रीसोबतच ती उत्तम आईसुद्धा आहे, यात काही दुमत नाही. अनेक कार्यक्रमांमध्ये तिला मुलगी आराध्यासोबत पाहिलं जातं. ऐश्वर्याला नुकतंच मुलगी आणि पती अभिषेकसोबत मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केले. मात्र यातील एका व्हिडीओमुळे ट्रोलर्सनी ऐश्वर्याला ट्रोल केलं.

एअरपोर्टवरून बाहेर येताना ऐश्वर्याने आराध्याचा हात धरला होता. मुलीचा हात धरूनच ती गाडीपर्यंत गेली होती. हे पाहून काही युजर्सनी ऐश्वर्या ट्रोल केलं. ’11 वर्षांची मुलगी आहे, तिचा हात धरून चालण्याची काय गरज’, असं एकाने म्हटलंय. तर ‘दोघींना एकत्र जोडण्यासाठी कोणता सिमेंट वापरला’, अशी उपरोधिक टीका दुसऱ्या युजरने केली.

ऐश्वर्याच्या या व्हिडीओवर ट्रोलर्सचे नकारात्मक कमेंट्स येत असतानाच तिच्या चाहत्यांनी मात्र तिची बाजू घेतली आहे. आराध्याचा हात पकडून चालण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना चाहत्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘कदाचित आराध्याच्या पायाला काही लागलं असावं, म्हणून तिने हात पकडला असावा. 11 वर्षांच्या मुलीवरून काय ट्रोल करताय’, असं एकाने म्हटलं. तर ‘तिची मुलगी, तिचा हात, तिच्या मर्जीनुसार काहीही करू दे, तुमचं काय’, असा सवाल ऐश्वर्याच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना केला.

ऐश्वर्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘पोन्नियिन सेल्वन- 2’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन- 1’मध्येही तिने भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं होतं.