Ajay Devgn | ज्युनियर अजय देवगण.. बापलेकाचे फोटो पाहून चाहते झाले खुश!

मोठ्या पडद्यावर जरी अजय दमदार अभिनय करत असला तरी खऱ्या आयुष्यात तो त्याच्या भावना फारशा व्यक्त करत नाही. त्यामुळे त्याने अशा प्रकारची पोस्ट केल्यावर त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोच.

| Updated on: Apr 15, 2023 | 2:58 PM
1 / 6
अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांना निसा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे. सोशल मीडियावर अनेकदा अजय त्याच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो पोस्ट करत असतो. नुकतेच नाही मुलासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 6
यामध्ये अजय देवगण त्याचा मुलगा युगसोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहे. 'कोणत्याही दिवसाचा सर्वोत्तम भाग म्हणजे हा. जगातील कोणत्याच गोष्टीच्या बदल्यात मी बापलेकाचे हे क्षण देऊ शकत नाही', असं कॅप्शन अजयने या फोटोंना दिलं आहे.

3 / 6
मोठ्या पडद्यावर जरी अजय दमदार अभिनय करत असला तरी खऱ्या आयुष्यात  तो त्याच्या भावना फारशा व्यक्त करत नाही. त्यामुळे त्याने अशा प्रकारची पोस्ट केल्यावर त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोच.

मोठ्या पडद्यावर जरी अजय दमदार अभिनय करत असला तरी खऱ्या आयुष्यात तो त्याच्या भावना फारशा व्यक्त करत नाही. त्यामुळे त्याने अशा प्रकारची पोस्ट केल्यावर त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोच.

4 / 6
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजय त्याच्या मुलांना केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगविषयी व्यक्त झाला. "मी माझ्या दोन्ही मुलांना हेच समजावतो की ऑनलाइन लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या तुलनेत तुम्हाला ट्रोल करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी असते, हे मी त्यांना सांगतो”, असं अजय म्हणाला.

5 / 6
“मला माहीत नाही की लोकांच्या मनात इतकी नकारात्मकता कुठून येते? आता मीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकलोय आणि मी माझ्या मुलांनाही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देतो”, असंही तो पुढे म्हणाला.

6 / 6
अजय नुकताच 'भोला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर त्याचा मुलगा युगसुद्धा त्याच्यासोबत होता. सेटवरचा फोटो पोस्ट करत अजयने त्याला त्याच्या बालपणीचे दिवस आठवल्याचं म्हटलं होतं.