अक्षय-प्रियंकाचं प्रचंड रोमँटिक गाणं, पाहून संतापलेली ट्विंकल, अक्षयने अर्धवट सोडलेला चित्रपट, गाणं एकट्यानेच बघा

प्रियंका चोप्रा आणि अक्षय कुमार यांचं प्रचंड रोमँटिक गाणं. ज्यामध्ये रोमँटिक सीन पाहून ट्विंकल खन्नाने अक्षयला दिलेला चित्रपट सोडण्याचा सल्ला. 17 वर्षानंतर गाणं झालेलं रिलीज.

अक्षय-प्रियंकाचं प्रचंड रोमँटिक गाणं, पाहून संतापलेली ट्विंकल, अक्षयने अर्धवट सोडलेला चित्रपट, गाणं एकट्यानेच बघा
| Updated on: Apr 15, 2026 | 2:43 PM

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांनी ‘ऐतराज’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले होते. मात्र, वक्त नंतर ही जोडी पुन्हा कधीही एकत्र मोठ्या पडद्यावर दिसली नाही. त्यामुळे या जोडीला पुन्हा पाहण्याची चाहत्यांची इच्छा कायम होती.

अशातच काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांचे ‘वो पहली बरसात’ हे गाणे प्रदर्शित झाले . विशेष म्हणजे, हे गाणे तब्बल 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2005 मध्ये शूट करण्यात आले होते पण ते काही वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले आहे.

हे गाणे बरसात या चित्रपटासाठी शूट करण्यात आले होते. सुरुवातीला या चित्रपटात अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा ही जोडी होती. मात्र, काही कारणांमुळे अक्षय कुमारने हा चित्रपट मधेच सोडला. त्यानंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी बॉबी देओल यांना मुख्य भूमिकेत घेऊन चित्रपट पूर्ण केला.

गाणं ठरलं सुपरहिट

‘बरसात’ चित्रपटातील ‘बरसात के दिन आए’ हे गाणे प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. हे गाणे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी गायले होते. विशेष म्हणजे, या गाण्याच्या मूळ शूटिंगमध्ये अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा ही जोडी होती, मात्र नंतर चित्रपटात बॉबी देओल यांची एंट्री झाली.

‘वो पहली बरसात’ आणि ‘बरसात के दिन आए’ या दोन्ही गाण्यांचे व्हिडिओ पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट दिसते दोन्ही गाणी एकाच लोकेशन आणि सेटिंगमध्ये शूट करण्यात आली आहेत. मात्र, दोन्ही व्हिडिओंमध्ये प्रियंका चोप्राच्या लूकमध्ये फरक दिसतो. अक्षयसोबतच्या व्हिडिओमध्ये ती ऑफ-व्हाइट स्लीव्हलेस कुर्तीमध्ये दिसली, तर बॉबी देओलसोबतच्या व्हर्जनमध्ये तिचा लूक नियॉन ग्रीन रंगात आहे.

ट्विंकल खन्नाचा अक्षय कुमारला चित्रपट सोडण्याचा सल्ला

अलीकडेच एका मुलाखतीत दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी या चित्रपटाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अक्षय आणि प्रियंका यांनी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते आणि टायटल ट्रॅकही एकत्र शूट केला होता. मात्र, त्याचदरम्यान अक्षय कुमारला काही वैयक्तिक कारणांमुळे चित्रपट सोडावा लागला.

काही वृत्तांनुसार, त्या काळात अक्षय आणि प्रियंका यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे ट्विंकल खन्ना यांनी अक्षय कुमारला हा चित्रपट सोडण्याचा सल्ला दिल्याचेही म्हटले जाते. तथापि, चित्रपट सोडण्यामागील खरी कारणे काय होती, हे फक्त अक्षय कुमारच स्पष्ट करू शकतो.

Follow Us