AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs LSG : पंजाबचा झंझावात कायम, पाचवा विजय, लखनौचा 54 धावांनी धुव्वा

Punjab Kings vs Lucknow Super Giants Match Result IPL 2026 : पंजाब किंग्सने घरच्या मैदानात लखनौ सुपर जायंट्सवर एकतर्फी फरकाने मात करत 19 व्या हंगामातील पाचवा विजय नोंदवला. पंजाब 5 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली.

PBKS vs LSG : पंजाबचा झंझावात कायम, पाचवा विजय, लखनौचा 54 धावांनी धुव्वा
Arshdeep Singh and Priyansh Arya PBKS vs LSGImage Credit source: PTI
| Updated on: Apr 20, 2026 | 3:39 AM
Share

पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) विजयी झंझावात कायम ठेवला आहे. पंजाबने रविवारी 19 एप्रिलला डबल हेडरमधील दुसऱ्या आणि आपल्या मोहिमेतील सहाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. पंजाबने आरसीबीचा रेकॉर्ड ब्रेक करत या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. पंजाबने लखनौसमोर 254 धावा केल्या. लखनौनेही प्रतिकार केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. लखनौला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 200 धावाच करता आल्या. पंजाबने अशाप्रकारे या मोसमातील आपला एकूण पाचवा विजय मिळवला. तर लखनौचा हा चौथा पराभव ठरला.

पंजाबचा झंझावात

लखनौने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबने 3 धावांवर पहिली विकेट गमावली. प्रभसिमरन सिंग झिरोवर आऊट झाला. त्यानंतर प्रियांश आर्या आणि कूपर कोनोली या दोघांनी धमाका केला. प्रियांश आणि कूपर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी रचली. या भागीदारीमुळे पंजाबला 250 पार मजल मारता आली. प्रियांश आणि कूपरने 80 बॉलमध्ये 182 रन्सची पार्टनरशीप केली.

प्रियांश आणि कूपर या दोघांना शतक करण्याची संधी होती. मात्र दोघेही झटपट आऊट झाले. कूपरने 46 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 8 फोरसह 87 रन्स केल्या. पंजाबसाठी ओपनर प्रियांशने सर्वाधिक धावा केल्या. प्रियांशंच शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. प्रियांशने 37 चेंडूत 9 सिक्स 4 फोरसह 93 रन्स केल्या. तर मार्कस स्टोयनिस याने 29 धावा केल्या. तर इतरांनी योगदान दिलं. पंजाबने अशाप्रकारे 7 विकेट्स गमावून 254 धावांपर्यंत मजल मारली. लखनौसाठी प्रिन्स यादव आणि मनिमरण सिद्धार्थ या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मोहसिन खान आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

स्कोअरकार्ड

लखनौची बॅटिंग

निकोलस पूरन (0) याचा अपवाद वगळता टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना अप्रतिम सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही अर्धशतकापर्यंत पोहचता आलं नाही. त्याच कारणामुळे लखनौला 200 धावांपुढे पोहचता आला नाही. लखनौसाठी कॅप्टन ऋषभ पंत याने सर्वाधिक धावा केल्या. पंतने 23 चेंडूत 43 धावा केल्या. एडन मारक्रम याने 42 धावा जोडल्या. ओपनर मिचेल मार्श याने 40 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या स्थानी बढती मिळालेल्या आयुष बडोनी याने 35 रन्स केल्या.अनूकल रॉय याने नाबाद 21 धावा करत पराभवातील अंतर कमी केलं. पंजाबसाठी मार्को यान्सेन याने 2 विकेट्स मिळवल्या. तर अर्शदीप सिंह, विजयकुमार वैशाख आणि युझवेंद्र चहल या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...