Akshay Kumar | अक्षय कुमार याने शर्टलेस फोटो शेअर करत चाहत्यांना दिली खास माहिती, अभिनेत्याने केले

अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंड येथे त्याच्या चित्रपटाची शूटिंग करत होता. अक्षय कुमार हा सतत चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार याचे एका वर्षात तब्बल चार चित्रपट रिलीज होतात. अक्षय कुमार हा नेहमीच त्याच्या फिटनेसकडे देखील लक्ष देतो.

Akshay Kumar | अक्षय कुमार याने शर्टलेस फोटो शेअर करत चाहत्यांना दिली खास माहिती, अभिनेत्याने केले
| Updated on: May 29, 2023 | 9:01 PM

मुंबई : बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अक्षय कुमार दिसला. अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर करत म्हटले होते की, यावेळी काहीतरी वेगळे येऊन खास प्रेक्षकांसाठी येणार आहे. अक्षय कुमार हा त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलत असल्याचा अंदाजा लावण्यात आला. अक्षय कुमार याचे एका मागून एक असे चित्रपट (Movie) सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अक्षय कुमार याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार हा उतराखंड येथे त्याच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत होता. या दरम्यान तो केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी देखील पोहचला होता. नुकताच उतराखंड येथील शूटिंग अक्षय कुमार याने पूर्ण केलीये. याची माहिती स्वत: अक्षय कुमार याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली.

विशेष म्हणजे या खास पोस्टसोबतच उतराखंडमधील एक फोटोही अक्षय कुमार याने शेअर केला आहे. अक्षय कुमार याने जो फोटो शेअर केला आहे, त्या फोटोमध्ये त्याने शर्ट घातले नाहीये. मागच्या साईटचा हा अक्षय कुमार याचा फोटो असून पाठीवर त्याच्या मुलाचे नाव दिसत आहे. अक्षय कुमार याच्या मुलाचे नाव आरव आहे.

हा फोटो शेअर करत अक्षय कुमार याने लिहिले की, अद्भुत देवभूमी, अद्भुत शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहे. लव्ह यू उत्तराखंड. आशा करतो की, लवकरच इथे परत येईल. आता अक्षय कुमार याने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अक्षय कुमार याच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार थेट उत्तराखंड पोलिसांसोबत व्हाॅलीबाॅल खेळताना दिसला होता. याचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एक चर्चा आहे की, आता लगेचच अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. अक्षय कुमार याने अगोदर हेरा फेरी 3 चित्रपटाला नकार दिला होता. मात्र, अचानक त्याने परत होकार दिला.