AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची एक चाल आणि चीन तोंडावर, आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या घडामोडी, भारताने थेट…

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भारताने काही गोष्टींमध्ये मोठे बदल केले असून थेट निर्णय घेतली जात आहेत. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतरही कोणताही परिणाम भारतावर झाला नाही.

भारताची एक चाल आणि चीन तोंडावर, आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या घडामोडी, भारताने थेट...
China India Trade
| Updated on: Dec 26, 2025 | 12:43 PM
Share

अमेरिकेने भारतावर उच्च शुल्क आकारले आहे. भारत आणि अमेरिकेत सध्या व्यापार चर्चा सुरू आहे. व्यापार करार पूर्ण होण्यापूर्वी भारतावर लावण्यात आलेले 50 टक्के शुल्क कमी करून 15 टक्क्यांवर आणावे, ही भारताची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी पुर्ण होणार नाही, तोपर्यंत भारत करार करणार नसल्याची भूमिका भारताची आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीनमधील संबंध बदलले. गेल्या काही वर्षात भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण राहिली. मात्र, अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावताच चीन भारतासाठी मैदानात आला आणि अमेरिकेच्या टॅरिफविरोधात थेट भूमिका घेतली. फक्त विरोधात भूमिकाच नाही तर भारतासोबत महत्वाचे करारही चीनने केले. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारतातून चीनमध्ये होणारी निर्यात प्रचंड वाढली.

भारताने चीनसोबतचे ताणलेले संबंध सुधारण्याचे आणि व्यापारी संबंधांमध्ये संतुलन साधण्याचे प्रयत्न सुरू केले. याचा उद्देश अमेरिकेच्या बाजारावरील अवलंबित्व कमी करणे आणि चीन, रशिया व इतर देशांमधील बाजारपेठांकडे व्यापार विस्तारणे हा आहे. नुकताच आलेल्या अहवालांनुसार, भारताची चीनसोबतची व्यापारी तूट आणखी वाढली आहे, चीनमधून होणारी आयातही वाढलीये.

मागच्या काही वर्षातील आकडेवारी बघताच भारताची निर्यात तशी वाढली आहे. मात्र, चीनच्या तुलनेत कमी आहे. चीन भारतामध्ये त्यांच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) या आर्थिक संशोधन संस्थेच्या अहवालातून एक अत्यंत महत्वाची माहिती पुढे आली. भारताला चीनची चिंता वाढवण्याची आणि न्यूझीलंडसारख्या बाजारपेठांमध्ये त्याच्या जागतिक वर्चस्वाला आव्हान देण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे.

2024-25 मध्ये न्यूझीलंडने चीनकडून 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तू आयात केल्या. भारताकडून 711 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या वस्तू खरेदी केल्या. भारत पेट्रोलियम उत्पादनांच्या जगातील सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे तर न्यूझीलंड दरवर्षी अंदाजे 6.1अब्ज अमेरिकन डॉलर्सची पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने थेट न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार करार केला आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील व्यापार वाढताना दिसतोय. न्यूझीलंडसोबत व्यापार वाढवून भारताने चीनला मोठा धक्का दिला.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी