AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dal Pakwan: सोप्या पद्धतीने घरी बनवा टेस्टी दाल पकवान, सर्वांना आवडेल ही सिंधी डिश

सिंधी खाद्यसंस्कृतीतील दाल पकवान हा एक लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहे. कुरकुरीत पकवान आणि मसालेदार डाळीचा हा बेत नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. जाणून घ्या, दाल पकवान घरी बनवण्याची सोपी रेसिपी.

Dal Pakwan: सोप्या पद्धतीने घरी बनवा टेस्टी दाल पकवान, सर्वांना आवडेल ही सिंधी डिश
SindhiImage Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Nov 26, 2026 | 3:52 PM
Share

सकाळच्या नाश्त्यासाठी रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळे आणि चविष्ट करून पाहा. सिंधी स्टाइल दाल पकवान हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कुरकुरीत पकवान आणि मसालेदार डाळ यांचा सुरेख मेळ असलेला हा पदार्थ सिंधी कुटुंबांमध्ये आवडीने बनवला जातो. मात्र, आता केवळ सिंधी लोकांमध्येच नाही, तर इतर लोकांमध्ये सुद्धा या पदार्थाची लोकप्रियता वाढली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्याची चव आवडते. विशेष म्हणजे, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही हा पदार्थ सहज बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया, चविष्ट सिंधी दाल पकवान बनवण्याची सोपी रेसिपी.

दाल पकवान बनवण्यासाठी साहित्य

– हरभरा डाळ एक वाटी

– बारीक चिरलेला टोमॅटो

– १ कांदा बारीक चिरलेले

– लाल तिखट

– धने पावडर एक चमचा

– गरम मसाला एक चमचा

– हळद

– चाट मसाला

– मोहरी

– जिरे

– लिंबू

– चिंच

– पाणी

– तेल

– मीठ

पकवान बनवण्यासाठी

– २ कप मैदा

– १ चमचा ओवा

– अर्धा चमचा तेल

– कोमट पाणी

– मीठ

दाल पकवान बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम दाल बनवण्यासाठी हरभरा डाळ धुवून अर्धा तास भिजत घाला. नंतर प्रेशर कुकरमध्ये पाणी, हळद आणि मीठ एकत्र करून डाळ शिजवा. कुकरमध्ये ५-६ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी तडतडून घ्या. नंतर टोमॅटो घालून शिजवा. टोमॅटो शिजल्यावर त्यात गरम मसाला आणि धनेपूड टाका. एक मिनिट परतून झाल्यावर त्यात शिजलेली हरभरा डाळ घाला. चांगले मिसळा आणि दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर शिजवा. तुमची दाल तयार आहे.

आता पकवान बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात मैदा घ्या. त्यात मीठ, ओवा, तेल आणि कोमट पाणी घाला. सर्व साहित्य मैद्यामध्ये मिसळा आणि घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ अर्धा तास बाजूला ठेवा. नंतर हे पीठ घेऊन त्याचा गोळा तयार करून लाटून घ्या. या पुरीवर काट्याच्या साहाय्याने होल करा. जेणेकरून ते तळताना फुगणार नाहीत. कढईत तेल गरम करा. या पुर्‍या गरम तेलात टाकून तळून घ्या. ते पूर्णपणे कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून प्लेटमध्ये काढा. आता यावर दाल टाका आणि चाट मसाला, कांदा, लिंबू घालून गरम गरम सर्व्ह करा.

Follow Us
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर