AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर

Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला… पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर

| Updated on: Nov 26, 2026 | 1:14 PM
Share

पुणे कोर्टाबाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मंदार किवळेंचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. हल्लेखोरांनी "शुभम दादा, आम्ही तुझ्या खुनाचा बदला घेतला" असे ओरडत कोयत्यांनी वार केले. मंदारने शुभमवर पहिला वार केल्याचे हल्लेखोरांनी म्हटले होते. गोळीबारानंतर कोयत्याने हल्ला केल्याचे मंदारने जबाबात म्हटले आहे.

पुणे कोर्टाबाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी मंदार किवळेंचा जबाब नोंदवला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. मंदार किवळेंनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर “शुभम दादा, तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला. आम्हीच कात्रजचे राजे आहोत” असे ओरडत होते.

हल्लेखोरांनी सुरुवातीला मंदार किवळेंना विचारले की, त्यांनीच शुभमवर पहिला वार केला होता का. त्यानंतर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो हुकला. गोळीबार हुकल्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्यांनी आणि चॉपरने मंदार किवळेंवर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान, हल्लेखोरांनी शुभमचे नाव घेत कोयते हवेत फिरवले आणि जोरदार घोषणाबाजी केली. पुणे पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात पुढील तपास सुरू केला असून, मंदार किवळेंच्या जबाबातून हल्ल्याचे स्वरूप आणि हल्लेखोरांचा हेतू स्पष्ट झाला आहे.

 

Published on: Nov 26, 2026 01:14 PM

Follow Us