AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC : चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह अनेक ठिकाणांना बॉम्बने उडवण्याचा इशारा

BMC : चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह अनेक ठिकाणांना बॉम्बने उडवण्याचा इशारा

| Updated on: Nov 26, 2026 | 1:03 PM
Share

मुंबई महापालिकेला पुन्हा एकदा धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये महापालिका मुख्यालय, महापौर कार्यालय, अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, मुंबईतील मेट्रो स्थानके आणि महालक्ष्मी रेसकोर्स बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांतील ही पाचवी धमकी असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई महापालिकेला पुन्हा एकदा धमकीचा मेल प्राप्त झाला आहे. या मेलमध्ये महापालिका मुख्यालय, महापौर कार्यालय, सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, मुंबईतील मेट्रो स्थानके आणि महालक्ष्मी रेसकोर्स बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. १० वाजून १२ मिनिटांनी मुंबई महानगरपालिकेच्या ईमेल आयडीवर हा मेल प्राप्त झाला.

यापूर्वीही मुंबई महापालिकेला अशा प्रकारचे धमकीचे मेल आले होते, त्यावेळी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा ही धमकी आल्याने शहराच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांत महापालिकेला आलेला हा पाचवा धमकीचा मेल आहे. वारंवार अशा धमक्या येत असतानाही मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. या घटनेनंतर तरी पोलीस आणि प्रशासन यावर काय उपाययोजना करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

Published on: Nov 26, 2026 01:03 PM

Follow Us