‘कॅनडा कुमार’च्या टीकेने वैतागला अक्षय कुमार; भारतीय पासपोर्टविषयी म्हणाला..

| Updated on: Nov 13, 2022 | 3:42 PM

भारतीय पासपोर्टच्या मुद्द्यावर अखेर अक्षयने सोडलं मौन

कॅनडा कुमारच्या टीकेने वैतागला अक्षय कुमार; भारतीय पासपोर्टविषयी म्हणाला..
Follow us on

मुंबई- अभिनेता अक्षय कुमार त्याच्या नागरिकत्वामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. इतकंच नव्हे तर त्याला सोशल मीडियावर अनेकदा ‘कॅनडा कुमार’ म्हणूनही ट्रोल केलं जातं. तीन वर्षांपूर्वी अक्षय कुमारने सांगितलं होतं की तो लवकरच त्याच्या भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणार आहे. आता तीन वर्षांनंतर त्याने पासपोर्टविषयी पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला अक्षय?

हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये अक्षय सहभागी झाला होता. या समिटमध्ये त्याने त्याच्या पासपोर्टबद्दल वक्तव्य केलं. अक्षयला पुन्हा एकदा त्याच्या पासपोर्टवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याने मी इतरांपेक्षा कमी भारतीय ठरत नाही. मी भारतीयच आहे. मी गेल्या नऊ वर्षांपासून इथे आहे, जेव्हा मला पासपोर्ट मिळाला होता. तेव्हा काय घडल, कशामुळे वगैरे त्याबद्दल मला बोलायचं नाही. माझे चित्रपट चांगले चालत नव्हते. होय, मी 2019 मध्ये म्हटलं होतं की मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि नंतर कोरोना महामारी आली. त्यामुळे दोन-अडीच वर्षे सर्व गोष्टी बंद पडल्या.” लवकरच त्याला भारतीय पासपोर्ट मिळणार असल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं.

कॅनडाच्या पासपोर्टबद्दल एका मुलाखतीत अक्षय म्हणाला होता, “काही वर्षांपूर्वी जेव्हा माझे चित्रपट चालत नव्हते, तेव्हा मी दुसरीकडे जाऊन काम करण्याचा विचार केला होता. माझे 14-15 चित्रपट फ्लॉप झाले होते. बरेच लोक तिथे (कॅनडा) कामासाठी जातात, पण तरीही ते भारतीयच आहेत. इथे जर नियतीने माझी साथ दिली नाही तर तिथे जाऊन काम करण्याचा विचार मी केला होता. मी तिथे गेलो, त्यासाठी नागरिकत्वाचा अर्ज केला आणि मला तो मिळाला.”

हे सुद्धा वाचा

कॅनडाचं नागरिकत्व असलं तरी मी भारतातील सर्व कर वेळेवर भरतो. मी या देशाचा आहे आणि नेहमीच भारतीय असेन, असंही अक्षय म्हणाला होता.