नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच आलिया भट्ट हिला भर कार्यक्रमात लागला डोळा, पुढे जे घडले ते…

आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट धमाका करताना दिसला. आलिया भट्ट ही काही दिवसांपूर्वीच आपल्या लेकीसोबत बाहेर जाताना दिसली, याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला.

नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच आलिया भट्ट हिला भर कार्यक्रमात लागला डोळा, पुढे जे घडले ते...
| Updated on: Oct 15, 2023 | 11:38 AM

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते 14 ऑक्टोबर रोजी एनएमएसीसीच्या 141 व्या आयओसी सत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक बाॅलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. फक्त बाॅलिवूड (Bollywood) कलाकारच नाही तर यावेळी राजकीय मंडळीची उपस्थिती देखील लक्षणीय दिसली. या उद्घाटनानंतर नरेंद्र मोदी यांचे एक भाषण देखील झाले. या आयओसी सत्राचे अनेक फोटो (Photo) आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या सत्रामध्ये शाहरुख खान, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि आलियी भट्ट हे देखील उपस्थित राहिले. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण हे एकमेकांच्या शेजारी बसल्याचे दिसतंय. दुसरीकडे मागच्या लाईनमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघे दिसत आहेत. यासोबतच इतरही बाॅलिवूड कलाकार या सत्रामध्ये उपस्थित असल्याचे दिसतंय.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. कारण चक्क या फोटोमध्ये आलिया भट्ट ही झोपलेली दिसतंय. धक्कादायक प्रकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच आलिया भट्ट ही थेट झोप काढताना दिसतंय. यामुळे हा फोटो पाहून सर्वजण हैराण झाले.

दुसरीकडे शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण हे भाषण लक्ष देऊन ऐकताना दिसत आहेत. आता याच फोटोमुळे आलिया भट्ट ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे दिसतंय. या व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे आलिया भट्ट ही सोशल मीडियावर तूफान ट्रोल होताना दिसत आहे. अनेकांनी आलियाची खिल्ली देखील उडवलीये. लोक तिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

एकाने कमेंट करत म्हटले की, हे बघा आपले बाॅलिवूड स्टार. दुसऱ्याने लिहिले की, अरे जाऊद्या लहान मुलीची ही आई आहे. तिसऱ्याने लिहिले की, अवघड आहे बाबा हिचे. अजून एकाने लिहिले की, रणबीर कपूर याला आता पश्चाताप होत असणार या आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न केल्याने. रणबीर कपूर देखील सध्या तूफान चर्चेत आहे. रणबीर कपूर याला थेट ईडीने समन्स पाठवल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.