कंगना रणौत वादादरम्यान अचानक ‘Sorry Hrithik’ ट्रेंड सुरु, हृतिक रोशनची आली कमेंट…

अभिनेता हृतिक रोशनने फ्रेडी बर्डीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर, "आपल्याला हृतिकची माफी मागायला हवी", या व्हायरल ट्रेंडवर पोस्ट करीत आपण या ट्रेंडमध्ये वाहण्याच्या ऐवजी तथ्यांवर आधारित बोलण्याच्या महत्वावर जोर दिला आहे.

कंगना रणौत वादादरम्यान अचानक Sorry Hrithik ट्रेंड सुरु, हृतिक रोशनची आली कमेंट...
Actors Hrithik Roshan and Kangana Ranaut
| Updated on: Aug 01, 2026 | 10:49 PM

कंगणा रणौत यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या निदर्शकांवर टीका केल्यानंतर त्या चांगल्याच ट्रोल होत असतानाच आता अभिनेता हृतिक रोशन यानेही या वादात उडी घेतली आहे. हृतिक रोशन याने व्हायरल होत असलेल्या ‘सॉरी हृतिक’ट्रेंडवर आपली रिएक्शन दिली आहे. हृतिक याने म्हटले आहे की सोशल मीडियातील भावनांच्या ऐवजी तथ्यांवर लक्ष द्या ! अभिनेता हृतिक रोशन याने एन्फ्लुएन्सर फ्रेडी बर्डीच्या इंस्टाग्राम पोस्टला उत्तर देताना स्पष्ट केले आहे की कंगना रणौत वादादरम्यान अचानक मिळालेल्या पाठींब्याने मी काही हुरुळून गेलेलो नाही..

नीट पेपर फुटी प्रकरणात जेन झी (Gen Z) आणि अभिनेत्री तसेच खासदार कंगना रणौत यांच्या दरम्यान मोठा वाद सुरु आहे.यामुळे सोशल मीडियावर मीम्स, ट्रोल आणि जुन्या क्लीप्सचा अक्षरश: पूर आला आहे. यात कंगना रणौत यांना टार्गेट केले जात आहे. अनेक युजर्सनी हृतिक रोशन सोबत कंगणाची जुन्या कायदेशीर लढाईला उजाळा दिला आहे. ज्यात ‘आम्ही हृतिक रोशनची माफी मागायला हवी’ असा ट्रेंड सुरु झाला आहे.

अखेर हा ट्रेंड काय आहे ?

हा ताजा ट्रेंड तेव्हा सुरु झाला जेव्हा कॉकरोच जनता पार्टी(CJP)चे प्रवक्ते सौरव दास यांनी कंगना यांच्या पर्सनल टिप्पणीला उत्तर देताना म्हटले होते, माझे मित्र मला मॅसेज करुन विचारत आहेत की ती तुझ्या जीवाची दुश्मन का बनली आहे ? त्यातील एकाने म्हटले की मी कदाचित थोडासा तरुणपणीचा हृतिक रोशन सारखा दिसतोय..माझ्या मित्रांनी मला हेच सांगितले आणि मला आश्चर्य वाटले. अखेर माझ्या सारख्या व्यक्तीवर तिच्यासारखी महिला का हल्ला करेल ?

सौरव दास याच्या या वक्तव्यानंतर व्हायरल ट्रेंडला आणखी हवा मिळाली आणि अनेक सोशल मीडिया युजर्सने हृतिक आणि कंगनाची २०१६ चा चर्चित कायदेशीर लढाईशी याची तुलना केली आहे. अशीच एक पोस्ट एन्फ्लुएंसर फ्रेडी बर्डी यांनी शेअर केली आहे. ज्यावर स्वत: हृतिक याने स्वत: रिएक्शन दिली आहे.

हृतिक याने काय दिले रिएक्शन?

पोस्टमध्ये लिहिले होते की ‘जगाने हृतिक रोशनची माफी मागायला हवी’ या पोस्टवर अभिनेत्याने कमेंट करुन लिहिलेय की माझा मित्रा, केवल ‘ए’ ची बाजू घेणे कारण तुम्हाला आता ‘बी’ पसंद नाही. आपल्या समाजातील एका मोठ्या व्यवस्थेतील समस्याचा छोटासा भाग आहे. मी वाट पाहिन, जेव्हा याचा संदर्भ योग्य असेल आणि तथ्यांवर आधारित असेल. तो योग्य असेल. मी वाट पाहिन. परंतू नंतर, आता कोणाला परवा आहे, हो ना ?

‘कंगना-हृतिक वाद काय ?

इंटरनेटवर हृतिक आणि कंगना याच्या दरम्यान २०१६ च्या वादाची चर्चा होत असते. ज्यात हृतिक याने पाठलाग करणे (स्टॉकिंग) आणि त्रास देण्याच्या आरोपाखाली बदनामीचा खटला देखील गुदरला होता. परंतू अभिनेत्याच्या अलिकडील कमेंटवरुन कळेत की ते आता सत्य समोर येण्याची वाट पाहात आहे. हा वाद जेव्हा सुरु झाला तेव्हा कंगना हीने दावा केला की दोघे रिलेशनशिपमध्ये होते. हृतिकने या दाव्याचे खंडन केले होते. आणि हे प्रकरण कायदेशीर लढाईत परिवर्तित झाले होते.

तपासादरम्यान हृतिकने पुरावे म्हणून आपला पासपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईल जमा केले होते. तर कंगना यांनी त्यांचा लॅपटॉप आणि आयपॅड पाण्यात भिजल्याने खराब झाले असल्याचे सांगित जमा केले नव्हते. २०११ मध्ये पुरावे न मिळाल्याने तपासयंत्रणांनी निल रिपोर्ट सादर करुन ही फाईल बंद केली होती.

येथे पोस्ट वाचा –

hritik post

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us