
दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 70s पासून ते आजपर्यंत चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ कायम आहे. अमिताभ बच्चन हे गेल्या 5 दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.चित्रपटसृष्टीचा बदलता चेहरा त्यांनी पाहिला आणि अनुभवला देखील आहे. बिग बी 82 वर्षांचे आहेत आणि मोठ्या आणि छोट्या पडद्यावर पूर्ण उर्जेने काम करत आहेत. सध्या ते त्यांचा लोकप्रिय क्विझ शो कौन बनेगा करोडपती होस्ट करत आहेत. या वयातही त्यांची एनर्जी कायम आहे. अमिताभ यांनी त्यांचा पहिला चित्रपट 1969 मध्ये केला होता आणि तेव्हापासून त्यांचा चित्रपटांचा प्रभाव सुरुच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ते कोणाच्या सल्ल्याने चित्रपट साइन करतात? होय अमिताभ नेहमी चित्रपट साईन करताना एका खास व्यक्तीचा सल्ला नक्कीच घेतात. आणि मगच पुढे निर्णय घेतात.
बिग बी या व्यक्तीचा सल्ला घेतात?
बिग बी ज्या खास व्यक्तीचा सल्ला घेतात त्यात त्यांची स्टार पत्नी जया बच्चन किंवा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हे दोघेही नाहीत. आता विचार करण्यासारखे आहे की शतकातील सुपरस्टार ज्याच्या सल्ल्याने चित्रपटांना होकार देतात ती व्यक्ती नक्की आहे तरी कोण? अमिताभ यांनी स्वत:च याबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते की जेव्हा जेव्हा ते चित्रपट साइन करतात तेव्हा ते त्यांची मुलगी श्वेताचा सल्ला घेतात. पत्नी किंवा मुलाचा सल्ला घेत नाहीत. बिग बी म्हणतात की त्यांच्या मुलीने ज्या ज्या चित्रपटाला होकार दिला आहे तो चित्रपट हिट ठरला आहे.
ते श्वेताचाच चित्रपटासाठी सल्ला का घेतात?
श्वेताने तिच्या आईवडिलांसारखे आणि भावासारखे अभिनय क्षेत्र निवडले नसले तरी, लेखिका म्हणून तिने खूप प्रसिद्धी मिळवली आहे.2018 मध्ये, मुलगी श्वेताच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात, बिग बी यांनी एक मोठा खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, ‘मी माझ्या प्रत्येक चित्रपटासाठी माझ्या मुलीचा सल्ला घेतो’. बिग बींच्या मते, त्यांच्या मुलीला कथांची चांगली समज आहे. बिग बी शेवटचे रजनीकांत अभिनीत ‘वेत्तैयां’ या चित्रपटात दिसले होते. सध्या ते नितेश तिवारी यांच्या ‘रामायण भाग 1’ या चित्रपटासाठी चर्चेत आहेत. यामध्ये ते जटायू या पात्रासाठी आवाज देणार आहेत.