AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी कपूर हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन, आकस्मिक मृत्यूमुळे बॉलीवूडवर दुःखाचा डोंगर

बॉलिवूड सेलिब्रिटींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... कारण एका खास व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला आहे, त्यांच्या निधनानंतर जान्हवी कपूर, नोरा फतेही, वरुण धवन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे.

जान्हवी कपूर हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन, आकस्मिक मृत्यूमुळे बॉलीवूडवर दुःखाचा डोंगर
| Updated on: Mar 17, 2026 | 2:24 PM
Share

बॉलिवूडमधून अशी एक दुःखद बातमी समोर आली आहे, ज्यामुळे अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई येथील हाय – प्रोफाईल सेलिब्रिटी हेयरस्टाइलिस्ट आणि मेकअप आर्टीस्ट मार्से पेड्रोजो (Marce Pedrozo) याचं निधन झालं आहे… मार्से पेड्रोजो याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यामातून दुःख व्यक्त करत जवळच्या मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे… सेलिब्रिटींनी मार्से पेड्रोजो याचे फोटो पोस्ट करत त्याच्यासोबत असलेल्या आठवणी शेअर केल्या आहेत…

आम्ही दोघे एकमेकांच्या टीमचा भाग होतो – जान्हवी कपूर

मार्से पेड्रोजो यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत जान्हवी म्हणाली, ‘आय लव्ह मार्से… ज्याप्रकारे मी माझ्या वॅनिटीमध्ये प्रवेश करायचे आणि आपण एकमेकांना पाहून मोठ्याने किंचाळायचो आणि म्हणायचो आपल्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत… ती अशक्य वाटणारी कामं, कामाचे वेडेवाकडे तास, तो सगळा गोंधळ, हे सगळंच खूप छान होतं. त्या सगळ्या गोंधळातही, जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र काम करायचो, तेव्हा मला विश्वासाची आणि आनंदाची भावना जाणवायची. तू  माझ्या टीमचा फक्त एक भाग नव्हतास तर, आम्ही दोघे एकमेकांची टीम होतो…’ असं म्हणत जान्हवी हिने दुःख व्यक्त केले.

पहिल्या दिवसापासून माझ्या प्रवासाचा भाग – नोरा फतेही

नोरा फतेही दुःख व्यक्त करत म्हणाली, ‘आज मी माझा सर्वात जवळचा मित्र आणि भावाला गमावलं आहे… अशी कोणतीच व्यक्ती नाही, जी माझ्या प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या सोबत होती… मार्से माझ्या पर्सनॅलिटीची सर्वात बेस्ट बाजू समोर आणायचा… जेव्हा जेव्हा लोकांनी आम्हाला पाहिलं, आम्ही कायम हसत खेळत असायचो…’ असं म्हणत नोरा हिने दुःख व्यक्त केलं..

अभिनेता वरुण धवन याने देखील दुःख व्यक्त केलं आहे. ‘रेस्ट इन पीस भाई… विश्वास बसत नाही… असं वाटत आहे काही दिवसांपूर्वी आपण एकमेकांसोबत शुटींग करत होतो… तो खूप प्रेमळ आणि चांगला व्यक्ती होता.’ असं वरुण म्हणाला. या कलाकारांव्यतिरिक्त, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने देखील 15 मार्च 2026 रोजी निधन झालेल्या मार्से पेड्रोजो याला श्रद्धांजली वाहिली. सध्या मार्से पेड्रोजो याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल