AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना कोणाची? सिब्बल यांनी दिले दोन दाखले; शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, एकनाथ शिंदे यांना जबर धक्का?

शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणचं यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, यावळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टात दोन खटल्यांचे दाखले देखील दिले आहेत.

शिवसेना कोणाची? सिब्बल यांनी दिले दोन दाखले; शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, एकनाथ शिंदे यांना जबर धक्का?
शिवसेना पक्षाच्या चिन्हावर सुनावणी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 06, 2026 | 5:14 PM
Share

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं होतं. शिवसेनेमध्ये दोन गट पडले, एक म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट दरम्यान तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर देखील दावा करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह आणि नाव हे शिवसेना शिंदे गटाला देण्यात आलं.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात दोन दाखले देखील दिले.

नेमकं काय म्हणाले कपिल सिब्बल? 

परिच्छेद ३ आणि ४ या दोन्हींचा संपूर्ण उद्देश हा बचावाचा (defence) आहे. जर माझ्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई सुरू केली, तर माझा बचाव असा असू शकतो की मी एक-तृतीयांश (1/3) आहे. परिच्छेद ४ अंतर्गत माझा बचाव असा असू शकतो की माझे दुसऱ्या पक्षात विलिनीकरण (merger) झाले आहे. मात्र, तुम्ही या तरतुदींचा असा अर्थ लावू शकत नाही.  लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील (Representation of the People Act) कलम २९-अ अंतर्गत विधिमंडळ पक्ष (legislature party) ही संकल्पनाच मान्य केलेली नाही. निवडणूक चिन्ह आदेशातही विधिमंडळ पक्षाची संकल्पना मान्य केलेली नाही. संस्थात्मक अखंडता (institutional integrity) ही लोकशाहीच्या केंद्रस्थानी आहे. पक्षांतर (defection) हे संविधानिक पाप आहे. आता मात्र ते अभिमानाचे चिन्ह (badge of honor) बनले आहे, असा युक्तिवाद यावेळी  सिब्बल यांनी केला आहे. दरम्यान आता या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल