Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवून देण्याची धमकी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या या धमकीमागील व्यक्ती कोण आहे आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे, याबाबत तपास यंत्रणांकडून माहिती घेतली जात आहे.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला ग्रेनेडने उडवून देण्याची धमकी
Amitabh Bachchan
| Updated on: Oct 23, 2026 | 1:43 PM

Amitabh Bachchan : मुंबईच्या महापौरांना धमकीचा ई-मेल मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये महापौर कार्यालयासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स इथं 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दिलजीतच्या कॉन्सर्टला लक्ष्य करण्याची धमकी या ई-मेलमधून देण्यात आली आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या या धमकीमागील व्यक्ती कोण आहे आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे, याबाबत तपास यंत्रणांकडून माहिती घेतली जात आहे.

दिलजीत दोसांझचा भारत दौरा सध्या चर्चेत आहे. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स इथं 27 नोव्हेंबर रोजी त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला धमकी मिळाल्याने आयोजक आणि चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दिलजीतच्या कार्यक्रमांबाबत सुरक्षेचे प्रश्न यापूर्वीही उपस्थित झाले आहेत. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या त्याच्या कॉन्सर्टला दिल्ली पोलिसांनी सुरक्षाविषयक कारणांमुळे परवानगी नाकारल्याचं वृत्त 22 ऑक्टोबर रोजी समोर आलं होतं.

Loading...

सांगायचं झालं तर, अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ही घटना घडली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार,  महापौर कार्यालयाबरोबरच अनेक शाळांनाही धमकी देण्यात आली आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि दिलजित दोसांज यांच्या कंसर्टलाही उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबईतल्या प्रमुख शाळांनाही धमकीवजा ईमेल पाठवण्यात आला आहे. दादरमधील प्रमुख शाळांना सकाळच्या सुमारास ही धमकी वजा ईमेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईमेलबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी शाळांची झडती घेतली आहे.  पण पोलीस तपासात संशयास्पद गोष्टी आढळून आल्या नाहीत. मात्र या धमकीवजा ईमेलमुळे शाळा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दादरमधील 3 ते 4 शाळांना हा ईमेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता हे मेल कोण आणि कुठून करत आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, टायगर याच्यावर हल्ला करण्याचा हल्लेखोरांचा हेतू नव्हता. अमिताभ बच्चन, सलमान खान. आमिर खान  यांच्यावर हल्लेखोर निशाणा सधणार होते, पण त्यांची सुरक्षा लक्षात घेत, हल्लेखोरांनी टायगर श्रॉफ याच्यावर पाळत ठेवली आणि अभिनेत्यावर गोळीबार केला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us