AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुलत्याच्या घरात पुतण्याचा कारनामा… दागिने चोरुन दारात उभी केली थार

पुतण्याने थार घेतली म्हणून चुलत्याला पूजा करण्यासाठी बोलावलं... पण तेव्हाच चुलत्याच्या घरातील दागिने गायब असल्याचं समोर आल्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. अखेर पुतण्याने चुलत्याच्या घरातील दागिने लंपास केल्याचं सत्य समोर आलं... जाणून घ्या एकाच घरात नेमकं काय घडलं...

चुलत्याच्या घरात पुतण्याचा कारनामा... दागिने चोरुन दारात उभी केली थार
| Updated on: Oct 23, 2026 | 1:52 PM
Share

आपल्याकडे कार असली पाहिजे, असं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं. यासाठी पुतण्याने थेट चुलत्याच्या घरातच चोरी केली. चुलत्याचे आणि चुलतीचे दागिने लंपास केल्यानंतर पुतण्याने नवीन थार दारात उभी केली. सर्वात चकित कणारी गोष्ट म्हणजे, ज्या चुलत्याने दागिने चोरलेले, त्याच चुलत्याला पुतण्याने नव्या थारची पूजा करण्यासाठी बोलावलं. अखेर तपास केल्याल्यानंतर कळलं की, पुतण्याने दागिने विकून आलेल्या पैशांमध्ये थार विकत घेतली आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील सातवे याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुतण्याला ताब्यात घेतलं आहे आणि कसून चौकशी सुरु केली आहे.

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील 19 वर्षीय आरोपी समर चव्हाण या तरुणांने चुलत्याच्या घरातून दागिने चोरी केले. समर याने चुलत चुलत्याच्या घरातून तब्बल 15 तोळे सोनं चोरी केलं आणि त्याच पैशातून नवीर थार खरेदी केली. समर याने चुलत्याचे दागिने विकून थार खरेदी केली आणि चुलत्यालाच कारच्या पूजेसाठी बोलावलं. तेव्हाच चोरी झाल्याचं निष्पन्न झालं. याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

कथित आरोपी समर पोपट चव्हाण त्याच्या कुटुंबीयासहित राहतो. त्याच्या शेजारीच चुलत चुलते उमेश मारुती चव्हाण राहतात. त्यांच्या घरातून समर चव्हाण याने साधारणपणे एक महिन्यापूर्वी 15 तोळे सोन्या्च्या दागिन्यांची चोरी केली. चोरलेले दागिने गावातीलच सोनार संग्राम बाबासो मोरे याला संगनमताने दहा लाख रुपये किमतीला विकले आणि त्याच दहा लाखातून चक्क महिंद्राची थार ही कार खरेदी केली.

नवी कार घरी आणल्यानंतर कारच्या पूजनासाठी त्याने चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना बोलावलं. पूजनाला जाताना उमेश चव्हाण आणि त्याच्या घरच्यांनी घालण्यासाठी दागिन्याच्या शोधाशोध केली असता ज्या ठिकाणी दागिने ठेवले होते त्या ठिकाणचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परंतु तिथं एक आश्चर्याची बाब घडली, ती म्हणजे, तिथेच बाजूला असलेले आजीचे दागिने मात्र चोरीला गेले नव्हते.

फक्त उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचे दागिने चोरीला गेले होते. यावरून चोर हा जवळचाच किंवा घरचाच असावा अशी शंका उमेश चव्हाण यांना आली. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर उमेश चव्हाणचा पुतण्या समर चव्हाण याने अचानक नवीन कार कोठून खरेदी केली ? त्यासाठी पैसे कोठून आले ? याची चौकशी केली असता समर चव्हाण यांनीच चोरी केल्याचं कोडोली पोलिसांना निष्पन्न झालं.

त्यानुसार कोडोली पोलिसांनी प्रत्यक्षात चोरी करणारा समर चव्हाण आणि त्याची चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार संग्राम मोरे या दोघांना ताब्यात घेतल असून त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करण्याचं तसेच पुढील तपास करण्याचे काम सुरू केलं आहे.. आता याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्याचे पर्यवेक्षणाधीन पोलीस उपाधीक्षक श्रीकांत ठिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Follow Us
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप