AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कट? त्या क्लिपवर शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

मनोज जरांगे-पाटील यांच्या 500 कोटींच्या आरोपांच्या क्लिपमुळे खळबळ उडाल्यानंतर शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी धक्कादायक दावा केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहू नयेत यासाठी हा कट असल्याचा त्यांचा आरोप आहे. या क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत, एआयमुळे क्लिप तयार झाल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कट? त्या क्लिपवर शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2026 | 1:49 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी काल एक क्लिप ऐकवून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदेंनी जरांगेंना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा या क्लिपमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शिंदे गटाने या क्लिपची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या क्लिपची चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी धक्कादायक विधान केलं आहे. एकनाथ शिंदे भविष्यात मुख्यमंत्री होऊ नये म्हणून हा कट असण्याची शक्यता आहे, असा दावा सत्तार यांनी केला आहे.

माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. जरांगेंची ती क्लिप एआयद्वारे बनलेली असण्याची शक्यता आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाल्यानंतर त्यांना क्लिप कोणी आणून दिली? कशामुळे आणून दिली? सरकारच्या माध्यमातून याची सखोल चौकशी होईल. एकदा सखोल चौकशी झाल्यावर दूध का दूध आणि पानी का पानी होईल. हा बिनगुडाचा आरोप आहे. एकनाथ शिंदे भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा कट असेल तर त्याचाही शोध घेतला जाईल, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

क्लिपमध्ये जे आरोप करण्यात आले आहेत. त्यात आम्हाला काही तथ्य वाटत नाही. असा आरोप झाल्यावर त्याची चौकशी केली पाहिजे. त्याचं मूळ कारण काय आहे? त्यामागे कोण आहे? हे शोधलं पाहिजे. या मागे काही षडयंत्र आहे का? हे तपासलं पाहिजे, असं सत्तार यांनी म्हटलंय.

बदल निश्चित आहे

यावेळी त्यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरही प्रतिक्रिया दिली. सकाळच्या 2 तासात मला मतदारांमध्ये फार मोठी उत्सुकता दिसली नाही. मतदारांमध्ये उत्सुकता का नाही याचे अनेक कारणं असू शकतात. 18 वर्षापासून आपण ज्या उमेदवाराला निवडून देत आहोत त्याच्याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता नाही. आजच्या परिस्थितीमध्ये तुल्यबळ लढत दिसत आहे. मतदार यावेळेस गुप्त पद्धतीने मतदान करत आहे याचा अर्थ बदल निश्चित आहे, असा दावा त्यांनी केला.

महायुतीला विरोध, भूमिकेवर ठाम

महायुतीच्या विरोधात तुमची भूमिका ठाम आहे का? त्यावर त्यांनी होय असं म्हटलं. मी शंभर टक्के ठाम आहे. आमचा सतीश चव्हाण यांना पाठिंबा नाही. आम्ही कामाला लागलो आणि प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराची धुरा आम्ही आमच्या मतदारसंघातून सुरुवात केली. वेळोवेळी भूमिका बदलली तर पक्षाची प्रतिमा मलिन होते. पक्षाबद्दल एकदा धोरणात्मक निर्णय घेतला की त्याला कायम ठेवावं लागतं. आमच्यासारख्या माणसाने रोज शब्द बदलला तर लोक त्याला वेटेज देणार नाहीत. आमच्या शब्दाला किंमत राहणार नाही. एकदा माणसाची बोलण्याची किंमत संपली की दुसऱ्यांदा लोकं विश्वास ठेवत नाहीत. पहिल्यापासून प्रतापसिंह यांच्यासोबत आहे. आजही आहे, असं ते म्हणाले.

Follow Us
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप