AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक… विधान परिषद निवडणुकीत स्पायकॅमचा वापर, खिशाला पेन लावून… सुप्रिया सुळेंच्या आरोपाने महाराष्ट्र हादरला

विधान परिषद निवडणुकीत भाजपने पैसे वाटपासाठी स्पायकॅम पेन वापरल्याचा धक्कादायक आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मतदारांच्या खिशाला पेन लावून मतदानाची नोंद करून पैसे दिल्याचे सुळे म्हणाल्या. या गंभीर आरोपाने महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, निवडणूक आयोगाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

धक्कादायक... विधान परिषद निवडणुकीत स्पायकॅमचा वापर, खिशाला पेन लावून... सुप्रिया सुळेंच्या आरोपाने महाराष्ट्र हादरला
supriya suleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2026 | 1:02 PM
Share

राज्यात विधान परिषदेच्या शिक्षण आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं मतदान सुरू आहे. या मतदानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नागपूर आणि पुण्यात तर रांगा लावून मतदान केलं जात आहे. निवडणुकीत गडबडी होऊ नये म्हणून सर्वच पक्ष डोळ्यात तेल घालून दक्ष आहेत. मात्र, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक धक्कादायक आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर करण्यात आल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून हा आरोप केला आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाकडून पैसे वाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मतदानानंतर तो दाखविल्यावर ठरलेले पैसे द्यायचे, असा प्रकार सुरू असल्याचे मतदार सांगत आहेत, असा खळबळजनक आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

तातडीने चौकशी करा

या तक्रारी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहेत. मतदानाची गोपनीयता आणि मतदारांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराची निवडणूक आयोगाने आणि शासनाने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करतानाच लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नयेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडलीच पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

भाजप उमेदवाराचा पर्दाफाश

सुप्रिया सुळे यांनी दुसरं ट्विट करून भाजपच्या उमेदवाराचा पर्दाफाश केला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मतदान केंद्रावर पक्षीय ओळख बाजूला ठेवून एक सामान्य मतदार म्हणून जाणे अपेक्षित असते. लोकशाहीच्या या पवित्र प्रक्रियेचे पावित्र्य आणि मतदान केंद्राची निष्पक्षता प्रत्येकाने जपली पाहिजे. उमेदवाराला पक्षाचे चिन्ह गळ्यात परिधान करुन मतदान केंद्रावर प्रवेश कसा दिला? ही सवलत केवळ सत्ताधारी उमेदवारालाच का दिली जाते? हा आदर्श आचारसंहितेचा भंग नाही का? तुम्ही सदर उमेदवारांवर नेमकी कोणती कारवाई करणार आहात याचे उत्तर महाराष्ट्र शासन, निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, अशी मागणीही सुळे यांनी केली आहे.

स्पायकॅम काय असतं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. मला स्पायकॅम काय असतं माहीत नाही. मी कधी पाहिला नाही. असं काही असेल तर सुप्रिया सुळे यांनी माझ्याकडे पाठवावा. जरूर चौकशी करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एक जरी कॅमेरा असेल तर…

दरम्यान, या आरोपावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे या खासदार आहेत. स्पाय कॅमेरा असेल तर तपास यंत्रणांकडे किंवा माध्यमांकडे द्या. मतदार घराबाहेर पडू नये म्हणून मतदारांना भीती घालण्याचा हा प्रयत्न नाही ना? जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे. तुमच्याकडे एक जरी कॅमेरा सापडला, तर स्वतः पाहणी करा. विनाकारण हवेत गोळीबार करू नका. पदवीधर आणि शिक्षक बाहेर पडले तर भाजप आणि महायुतीला मतदान करणार आहेत, म्हणून घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा नवनाथ बन यांनी केला आहे.

Follow Us
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा