मध्यरात्री जागी झाली अमिताभ बच्चन यांची देशभक्ती! अनेकांकडून ट्रोल

महानयक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात, पण आता एका ट्विटमुळे बिग बी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत... सध्या सर्वत्र बिग बीची चर्चा रंगली आहे...

मध्यरात्री जागी झाली अमिताभ बच्चन यांची देशभक्ती! अनेकांकडून ट्रोल
फाईल फोटो
| Updated on: Jul 29, 2025 | 12:59 PM

महानायक अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बिग बी कायम त्यांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील जास्त आहे. पण गेल्या काही दिवसांपासून बिग बी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील आहेत. कारण, अमिताभ बच्चन आता दिवसा नाही तर मध्यरात्री एक्सवर पोस्ट करत असतात. आता देखील त्यांचं असंच केलं आहे. सध्या अमिताभ बच्चन यांचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी एक्स अकाउंटवरून पहाटे 2.42 वाजता ट्विट केलं. ट्विट करत त्यांनी लिहिलं की, तो काळ गेला, जेव्हा देश नम्रतेने बोलत होता! आता देशाचे वर्चस्व इतरांवर दबाव आणतंय. बिग बींच्या या ट्विटनंतर युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

बिग बींच्या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना वाढत्या महागाईबद्दल लिहिण्यास सांगितलं. तर अनेकांना स्पष्ट बोलण्याचा सल्ला दिला. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘अमिताभ बच्चन कधी पेट्रोल आणि डिझेलवर देखील लिहा… तुम्हाला महागाई दिसत नाही ता….’, ‘अमिताभ बच्चन आता झोपेतून जागे झाले…’, तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘पूर्वी पेट्रोल – डिझेलचे भाव वाढल्यावर मेगास्टार व्यक्त व्हायचे. पण 2014 पासून त्यांनी मौन बाळगलं आहे…’ अनेकांनी अमिताभ बच्चन यांना ट्रोल केलं आहे.

 

 

सांगायचं झालं तर, बिग बी कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. नव्या सिनेमाचं अपडेट किंवा मनातील भावना मांडण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतात. फक्त सोशल मीडियावर नाही तर, जगभरात अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आजही चाहते अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात.

अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. वयाच्या 82 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन चाहत्यांचं सिनेमांच्या माध्यमातून मनोरंजन करत आहेत. अमिताभ बच्चन फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात.