AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणबीर कपूरच्या ‘रामायणा’त अमिताभ बच्चन यांचा जावई; भूमिका जाणून व्हाल थक्क!

महानायक अमिताभ बच्चन यांच्या जावयाची देखील 'रामायण' सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. पण अभिनेता बिग बींचा जावई असल्याचं फार कोणाला माहिती नाही.. तर जाणून घ्या कोण आहे बच्चन कुटुंबियांचा जावई आणि सिनेमातील त्याची भूमिका...

रणबीर कपूरच्या 'रामायणा'त अमिताभ बच्चन यांचा जावई; भूमिका जाणून व्हाल थक्क!
| Updated on: Apr 06, 2026 | 9:32 AM
Share

अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘रामायण’ सिनेमाच्या प्रेक्षक प्रतिक्षेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमा यंदाच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. नुकताच ‘रामायण’ सिनेमाची टीझर प्रदर्शित झाला. टीझर पाहिल्यानंतर अनेकांनी सिनेमाची तुलना रामानंद सागर यांच्या रामायणाशी केली आहे. सध्या ‘रामायण’ सिनेमाच्या बजेट पासून सिनेमाच्या कास्टपर्यंत चर्चा रंगली आहे. सिनेमात फक्त अमिताभ बच्चनच नाही तर त्यांचे जावई देखील दिसणार आहे. अशात बिग बी आणि बच्चन कुटुंबाच्या जावायाला एकाच स्क्रिन प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सिनेमात बिग बींचा जावई देवराज इंद्र या भूमिकेत दिसणार आहे आणि देवराज इंद्र ही भूमिका अभिनेता कुणाल कपूर साकारणार आहे.

रामायण सिनेमाची कास्ट

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर याच्यासोबत सिनेमात रवी दुबे, साई पल्लवी, सनी देओल, यश, अमिताभ बच्चन, लारा दत्ता, अरुण गोविल, इंदिरा कृष्णन, कुणाल कपूर, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय, आदिनाथ कोठारे, शाबी चड्ढा, शिशिर शर्मा, अजिंक्या देओ, सोनिया बलानी, मोहित रैना आणि कियारा सध मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

देवराज इंद्र या भूमिकेत दिसणार कुणाल कपूर

‘रामायण’ सिनेमात महानायक अमिताभ बच्चन जटायू भूमिकेत दिसणार आहेत. तर कुणाल कपूर देवराज इंद्र भूमिकेत दिसणार आहे… रिपोर्टनुसार, कुणाल (इंद्र) आणि यश (रावण) यांच्यामध्ये महाकाव्य युद्ध सीन प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

अमिताभ बच्चन यांचा जावई कुणाल कपूर

फार कमी लोकांना माहिती आहे की, कुणाल कपूर, बच्चन कुटुंबियांचा जावई आहे. सांगायचं झालं तर, कुणाल कपूर, बिग बींचे मोठे भाऊ अजिताभ बच्चन यांची लहान लेक नयना हिचा पती आहे… अमिताभ बच्चन आणि अजिताभ बच्चन यांच्यामध्ये 5 वर्षांचं अंतर आहे आणि ते उद्योजक आहेत… त्यांच्या पत्नीचं नाव रमोला भीम बच्चन असं आहे.. त्यांना नयना, नम्रता आणि नीलिमा बच्चन या तीन मुली आहेत.

बच्चन कुटुंबियांच्या जावयाबद्दल सांगायचं झालं तर, कुणाल याला अभिनेता आमिर खान स्टारर  ‘रंग दे बसंती’ सिनेमातून ओळख मिळाली. त्यानंतर त्याने  ‘बचना-ए-हसीनों’, ‘चुनरी में दाग’, आणि ‘आजा नच ले’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं… पण काही वर्ष अभिनयापासून दूर राहिलेल्या कुणाल याने ‘वेलकम तो सज्जनपुर’ आणि ‘हॅट्रिक’ सिनेमातून पुन्हा पदार्पण  केलं.

Follow Us
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!