AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसले बिग बी; जया बच्चनसोबतच्या VIDEO ने वेधलं लक्ष

Amitabh Bachchan Video : केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती. त्यामुळे चाहते खूप चिंतेत होते. याचदरम्यान बिग बी एका इव्हेंटमध्ये दिसले होते. त्याचा व्हिडीओ समोर आलय.

Amitabh Bachchan : दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसले बिग बी; जया बच्चनसोबतच्या VIDEO ने वेधलं लक्ष
| Updated on: Oct 03, 2026 | 6:46 PM
Share

Amitabh Bachchan Video : बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे पुढल्या आठवड्यात, 11 ऑक्टोबर रोजी, त्यांचा 84 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान ते पडल्याने त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली होती. केबीसीच्या सेटवर त्यांना लागलं होतं. मात्र या बातमीमुळे त्यांचे चाहते चांगलेच होते. मात्र आता ते नुकतेच एका इव्हेंटमध्ये दिसले होते. काल, 2 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन आणि लेखक गुलजार यांच्यासोबत एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात दिसले. त्यांना पाहून चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांना मदत करताना दिसत आहेत. दुखापत झाल्यानंतरही कामाप्रती असलेली त्यांची बांधिलकी पाहून चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे.

चाहत्यांनी केलं बिग बींचं कौतुक

या व्हिडीओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिलं, “ जर मी ही त्यांची ही मेहनत आणि निष्ठा शिकलो, तर माझं आयुष्य मार्गावर येईल.” तर “या वयातही काम करत राहण्याची त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे.” असं म्हणत दुसऱ्या एका चाहत्याने कौतुक केलं. काही चाहत्यांनी तर जया बच्चन यांच्या हसण्याचंही कौतुक केलं. एका युजरने लिहिलं, “ती खरंच आनंदी दिसत आहे, हे स्पष्टपणे जाणवतं.”

अमिताभ बच्चन यांनी दुखापतीबद्दल काय सांगितलं?

अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं की, नेहमीप्रमाणे उभं राहून मोनोलॉग करण्याऐवजी यावेळी त्यांना बसून तो सादर करावा लागला. ते म्हणाले की, शूटिंगदरम्यान त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. त्यामुळे त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे बराच वेळ उभं राहणं त्रासदायक होत असल्याने त्यांनी बसून मोनोलॉग पूर्ण केल्याचं त्यांनी नमूद केलं.

रिटायरमेंटच्या चर्चेवर बिग बींनी दिलं होतं स्पष्टीकरण

अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोड़पति 18’चं सूत्रसंचालन करत आहेत. काही काळापूर्वी त्यांच्या एका ब्लॉग पोस्टमुळे त्यांच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगली होती. अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये ‘wishes to retire’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे ते अभिनयातून निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, नंतर अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ अभिनय किंवा चित्रपटसृष्टी सोडण्याचा नव्हता. ते केवळ उशीर झाल्यामुळे झोपण्यासाठी ‘रिटायर’ होण्याबद्दल बोलत होते.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...