
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य नेहमीच चर्चेत असतो. बिग बींची नात नव्या नवेली नंदा देखील काहीना काही कारणाने नेहमी चर्चेत असते. नव्या तिच्या साध्या राहणीमान आणि तिच्या कामाबद्दल बोलताना जास्त दिसते. तिचा साधेपणा सर्वांना नेहमीच भावतो. आता पुन्हा एकदा नव्याने नेटकऱ्यांची मने जिकंली आहेत.सर्वांनाच माहित आहे की नव्याच्या कुटुंबात संपत्तीची कमतरता नाही. तिचे वडील निखिल नंदा हे एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडचे डायरेक्टर आहेत. वृत्तानुसार, अमिताभ यांच्या जावयाची कोट्यवधींमध्ये संपत्ती आहे. एस्कॉर्ट्स कुबोटाने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंगला 30 वर्ष पूर्ण झाले. हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. त्यावेळी सर्वजण सूट-बूटमध्ये असताना नव्या तिच्या भारतीय पोशाखानं, साधेपणानं आणि संस्कृतीने सर्वांची मने जिंकली.
नव्याने साधा सिंपल पंजाबी सूट घातला होता
नव्याने साधा सिंपल पंजाबी सूट घातला होता. नव्या नवेली नेहमीच साधे कपडे निवडताना दिसते. पण यातही तिचा लूक सुंदर आणि आकर्षक बनतो. नव्याने कार्यक्रमात ऑफ-व्हाईट रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता.
नव्याच्या कुर्त्याच्या डिझाइनकडे पाहता, तिने गोल नेकलाइनवाला कुर्ता घातला होता. कुर्त्यावर मशीन वर्क वापरून तयार केलेले डिझाइन पांढऱ्या रंगामुळे ते उठून दिसत होते. तिने हा कुर्ता प्लाजोसोबत वेअर केला होता.तसेच तिने त्यावर दुपट्टाही घेतला होता. अगदी हलकासा मेकअप अन् डायमंड इअररिंग्जसोबतच तिने तिचा हा लूक पूर्ण केला होता.या कार्यक्रमाला जवळपास अनेक व्यावसायिक उपस्थित होते. नव्याचे वडील निखिल नंदा देखील यावेळी उपस्थित होते.
नव्याच्या कामाबद्दल…
अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा एक उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि पॉडकास्टर आहे. ती प्रोजेक्ट नावेली (महिला सक्षमीकरणासाठी एक नॉन-प्रॉफिट) ची संस्थापक आहे, आरा हेल्थ (महिला आरोग्य तंत्रज्ञान कंपनी) ची सह-संस्थापक आहे आणि ‘व्हॉट द हेल नव्या?’ या पॉडकास्टची होस्ट आहे, तसेच तिच्या कुटुंबाच्या व्यवसायातही सक्रिय आहे आणि सध्या IIM अहमदाबादमधून MBA करत आहे.
तिच्या कामाचे मुख्य क्षेत्र:
उद्योजकता: ती आरा हेल्थ (Aara Health) या महिला आरोग्य तंत्रज्ञान कंपनीची सह-संस्थापक आहे आणि तिच्या कुटुंबाच्या कृषी-यंत्रांच्या व्यवसायातही सक्रिय आहे.
सामाजिक कार्य: तिने ‘प्रोजेक्ट नावेली’ (Project Naveli) सुरू केले आहे, जे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठी काम करते.
पॉडकास्टिंग: ती ‘व्हॉट द हेल नव्या?’ (What The Hell Navya?) या पॉडकास्टची होस्ट आहे, जिथे ती वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करते.
शिक्षण: ती सध्या IIM अहमदाबादमधून MBA करत आहे, ज्यामुळे ती उद्योजक म्हणून नवीन कौशल्ये शिकत आहे.
थोडक्यात, नव्या नवेली नंदा ही व्यवसाय आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेली एक तरुण उद्योजिका आहे, जी महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करते.