AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक,परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला; दहावीचा विद्यार्थी गंभीर जखमी

पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे एसएससी परीक्षेदरम्यान धक्कादायक घटना घडली आहे.परीक्षा केंद्रातच एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक,परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला; दहावीचा विद्यार्थी गंभीर जखमी
crime scene
| Updated on: Mar 17, 2026 | 7:20 PM
Share

बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा सुरु असताना शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे परीक्षा केंद्रातच एका दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात या विद्यार्थ्यांचे प्राण केवळ नशिबाने वाचले आहेत. या घटनेमुळे पुण्यातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. आणि पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात दहावीची एसएससी बोर्डाची परीक्षा सुरू असताना सकाळी अचानक गोंधळ उडाला. एक अल्पवयीन मुलगा थेट परीक्षा केंद्राच्या वर्गात घुसला आणि त्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला.त्यावेळी या विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखत हा वार हातावर झेलला त्यामुळे या मुलाचे प्राण थोडक्यात वाचले. या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परीक्षा केंद्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

थोडक्यात बचावला

या हल्लेखोराने या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखत तो वार हातावर झेलला. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. परंतू या घटनेत हा विद्यार्थी मात्र जखमी झाला आहे. घटनेनंतर परीक्षा केंद्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीसह आणखी चार जणांना ताब्यात घेतले. हल्ल्यासाठी वापरलेला कोयताही पोलिसांनी जप्त केला आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल