पार्टी सारा अली खानची, चर्चा फक्त अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरची, ‘ते’ फोटो व्हायरल, वाचा काय घडले?

सारा अली खान हिने नुकताच मुंबईमध्ये खास दिवाळी पार्टीचे आयोजन केले. विशेष म्हणजे या पार्टीला अनेक स्टारने हजेरी लावली. आता पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

पार्टी सारा अली खानची, चर्चा फक्त अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरची, ते फोटो व्हायरल, वाचा काय घडले?
| Updated on: Nov 10, 2023 | 3:57 PM

मुंबई : नुकताच सैफ अली खान याची लेक सारा अली खान हिने मुंबईमध्ये खास दिवाळी पार्टीचे आयोजन केले. या दिवाळी पार्टीला अनेक स्टारने हजेरी लावली. आता या पार्टीमधील काही खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सारा अली खान हिच्या दिवाळी पार्टीमध्ये अनन्या पांडे ही बाॅयफ्रेंड आदित्य रॉय कपूर याच्यासोबत पोहचली. यावेळी दोघांचाही जबरदस्त असा लूक दिसला. यावेळी करण जोहर हा देखील अतरंगी लूकमध्ये पोहचल्याचे बघायला मिळाले.

सारा अली खान हिने ठेवलेल्या दिवाळी पार्टीमध्ये अनेक स्टार खास लूकमध्ये पोहचले. करण जोहर याच्या लूकचे देखील फोटो हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सारा अली खान हिने काही दिवसांपूर्वीच करण जोहर याच्या शोमध्ये आपल्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केलाय. तिने पहिल्यांदाच आपल्या रिलेशनशिपवर थेट भाष्य केल्याचे बघायला मिळाले.

सारा अली खान हिने स्पष्ट केले की, जग तिला जी सारा समजत आहे ती सारा ती नव्हेच. कारण गेल्या काही दिवसांपासून सतत सारा अली खान आणि शुभमन गिल यांचे नाव चर्चेत आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र, सारा अली खान हिने स्पष्ट केले की, ती सध्या सिंगलच आहे.

सारा अली खान आणि अनन्या पांडे करण जोहर याच्या शोमध्ये पोहचल्या होत्या. यावेळी अनन्या पांडे हिने देखील तिच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला. अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. इतकेच नाही तर हे दोघे अनेक वेळा विदेशात जाताना स्पाॅट देखील झाले आहेत.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यापूर्वी मुंबईमध्ये अनेकदा स्पाॅट झाले. इतकेच नाही तर बऱ्याच वेळा पापाराझी यांना पाहून चेहरा लपवताना अनन्या पांडे ही दिसली आहे. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचे विदेशातील काही अत्यंत खास फोटो देखील व्हायरल झाले. मध्यंतरी जोरदार चर्चा होती की, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचा साखरपुडा हा लवकरच पार पडार आहे.