
मुंबई : चंकी पांडेची लेक अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिने अत्यंत आलिशान असे घर खरेदी केले. या घराच्या पूजेचे काही फोटो हे अनन्या पांडे हिने शेअर केले. विशेष म्हणजे अनन्या पांडे हिने खरेदी केलेले हे घर कोट्यवधी रूपयांचे आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आपल्या कमाईमधून अनन्या पांडे हिने हे घर खरेदी केले. विशेष म्हणजे अनन्या पांडे हिच्या या घराचे इंटीरिअर डिझाईन शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान हिने केले. सुहाना खान आणि अनन्या पांडे या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.
नुकताच अनन्या पांडे हिने सोशल मीडियावर काही खास फोटो तिच्या घरातील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनन्या पांडे हिच्यासोबत गाैरी खान ही दिसत आहे. गाैरी खान हिने अनन्या पांडे हिचे घर अत्यंत खास असे डिझाईन केल्याचे त्या फोटोमधून स्पष्ट दिसत आहे. हाॅलमधील दोन फोटो हे अनन्या पांडेने शेअर केले आहेत.
या फोटोसोबतच अनन्या पांडे हिने खास कॅप्शन दिले असून यासोबतच ती गाैरी खानचे धन्यवाद मानताना या फोटोमध्ये दिसत आहे. फक्त अनन्या पांडे हिच नाही तर गाैरी खान हिने बऱ्याच कलाकारांचे घर डिझाईन करून दिली आहेत. आलिया भट्ट हिच्यापासून ते कियारा अडवाणी हिच्यापर्यंत अशी मोठी लिस्ट यामध्ये आहे.
आता अनन्या पांडे हिने शेअर केलेल्या या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये अनन्या पांडे आणि गाैरी खान या हाॅलमध्ये उभ्या दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये या सोप्यावर बसल्याचे बघायला मिळतंय. आता अनन्या पांडे हिने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे ही या नव्या घरात राहण्यासाठी गेलीये. अनन्या पांडे ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. इतकेच नाही तर मुंबईमध्ये अनेकदा हे दोघे एकसोबत स्पाॅट झाले आहेत. विदेशातही धमाल करताना आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे दिसले आहेत.