या अभिनेत्याला नीना गुप्तांसह करायचा आहे रोमान्स, म्हणाला एक तरूण मुलगा..

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या सध्या 'लस्ट स्टोरी 2' मुळे चर्चेत आहेत. त्यातील त्यांच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे. या चित्रपटातील त्यांच्या एका सहकलाकाराने त्यांच्या सोबत पदड्यावर रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या अभिनेत्याला नीना गुप्तांसह करायचा आहे रोमान्स, म्हणाला एक तरूण मुलगा..
| Updated on: Jul 06, 2023 | 2:24 PM

नवी दिल्ली : ‘लस्ट स्टोरीज 2’ (Lust Stories 2) या चित्रपटाची बरीच चर्चा असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील एका स्टोरीमध्ये अंगद बेदीने (angad bedi) मृणाल ठाकूरच्या पतीची भूमिका निभावली आहे. अंगद बेदीने त्याची को-स्टार असणाऱ्या नीना गुप्ता (neena gupta) यांच्याबदद्ल केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. नीना गुप्ता यांच्याबद्दल तो भरभरून बोलला आहे. त्यासोबतच त्याने नीना यांच्यासोबत मोठ्या किंवा छोट्या पदड्यावर रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नीना गुप्ता यांच्या प्रतिभेच्या तुलनेत त्यांना योग्य स्थान मिळाले नाही, असेही अंगद म्हणाला.

नीना गुप्ता, मृणाल ठकुल आणि अंगद बेदी स्टारर ‘लस्ट स्टोरीज 2’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अंगद बेदी हा मृणाल ठाकूरच्या प्रियकराच्या भूमिकेत आणि नीना गुप्ता तिच्या आजीच्या भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता अंगद बेदीला नीना गुप्तासोबत पडद्यावर रोमान्स करायचा आहे. अंगद हा नीना गुप्ता यांचे कौतुक करताना थकत नाही. तो म्हणाला की, मला एकदा त्यांच्यासोबत छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर रोमान्स करायचा आहे. एखादा तरूण मुलगा एका मोठ्या वयाच्या स्त्रीसोबत रोमान्स करेल, अशा प्रोजेक्टची अंगद वाट बघत आहे.

नीना यांचे केले कौतुक

एका मुलाखतीत अंगदने नीना यांचे खूप कौतुक केले. त्यांच्यासोबत पडद्यावर रोमान्स करायला आवडेल, याचा पुनरुच्चार त्याने केला. ‘एखादी वादग्रस्त गोष्टही त्या सहज, स्पष्टपणे मांडू शकतात, अशी प्रतिभा (नीना गुप्ता) त्यांच्याकडे आहे. याच टॅलेंटमुळे, त्यांच्या एखाद्या वक्तव्याचा कोणालाच राग येत नाही, वाईट वाटत नाही, ‘ असे अंगद म्हणाला. लस्ट स्टोरी 2 मध्ये नीना जींनी दादीच्या व्यक्तिरेखेतही अप्रतिम अभिनय केल्याचे त्याने नमूद केले.