Anirudh-Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्या मारन यांच्या लग्नासाठी रजनीकांत, एम. के. स्टॅलिन यांच्यासह VVIP पाहुणे रवाना

Anirudh-Kavya Wedding: प्रसिद्ध गायक, संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी रजनीकांत आणि एम. के. स्टॅलिन यांच्यासह VVIP पाहुणे ग्रीसला रवाना झाले आहेत.

Anirudh-Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्या मारन यांच्या लग्नासाठी रजनीकांत, एम. के. स्टॅलिन यांच्यासह VVIP पाहुणे रवाना
रजनीकांत, काव्या मारन- अनिरुद्ध रविचंदर, एम. के. स्टॅलिन
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 09, 2026 | 3:14 PM

Anirudh-Kavya Wedding: दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत सध्या एका शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नसोहळ्याची तयारी सुरू झाली असून, या खास सोहळ्यासाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून राजकीय वर्तुळापर्यंत अनेक दिग्गज ग्रीसला रवाना झाले आहेत. सुपरस्टार रजनीकांत आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची विमानतळावरील उपस्थिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनिरुद्ध आणि काव्या यांच्या लग्नासाठी सुपरस्टार रजनीकांत हे मुलगी ऐश्वर्या रजनीकांतसोबत ग्रीसला रवाना झाल्याचं समोर आलं आहे. चेन्नई विमानतळावरील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विमानातील एका कर्मचाऱ्यासोबतचा त्यांचा फोटोही चर्चेत आहे. अनिरुद्ध आणि रजनीकांत यांचं नातं केवळ व्यावसायिक नसून कौटुंबिकदेखील आहे. अनिरुद्ध हा रजनीकांत यांचा पुतणा आहे. त्याने ‘पेट्टा’, ‘दरबार’, ‘जेलर’ आणि ‘वेट्टैयन’ यांसारख्या चित्रपटांना संगीत दिलं आहे. या विवाहसोहळ्यासाठी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे पत्नी दुर्गा स्टॅलिन यांच्यासह रवाना झाल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत उदयनिधी स्टॅलिन आणि त्यांचे कुटुंबीयही ग्रीसला जाणार आहेत. विमानतळावरील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काव्या मारन यांचे वडील कलानिधी मारन आणि स्टॅलिन कुटुंबीय यांच्यातही जवळचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे या विवाहसोहळ्याला राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

Loading...

रजनीकांत यांचा व्हिडीओ

एम. के. स्टॅलिन यांचा व्हिडीओ

अनिरुद्ध आणि काव्या यांचा विवाह 11 नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये पार पडण्याची शक्यता आहे. हा सोहळा अत्यंत खासगी स्वरूपाचा असणार असून, त्यामध्ये कुटुंबीय आणि मोजक्या जवळच्या मित्रमंडळींनाच आमंत्रित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ग्रीसमधील विवाहसोहळ्यानंतर 21 नोव्हेंबरला चेन्नईमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या सोहळ्याला मनोरंजन, राजकारण, क्रिकेट आणि उद्योगविश्वातील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनिरुद्ध-काव्या यांच्या लग्नाची चर्चा केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपुरती मर्यादित न राहता देशभरात रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us