AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे जर मी बोललो तर चालेल का? सतेज पाटील यांचा हसन मुश्रीफ यांना थेट सवाल

या मोर्चाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून लोक आले आहेत. हा मोर्चा केवळ कोल्हापूरचा राहिला नाही. तो महाराष्ट्रव्यापी झाला आहे. सहकराचा कायदा पायदळी तुडवला जात आहे. शपथ घेताना कुणाबद्दल ममत्त्व बाळगणार नाही, सुडबुद्धीने वागणार असं आपण म्हणतो. मग तरीही वारंवार ठरावीक लोकांबद्दल ममत्त्व का बाळगलं जातंय? असा सवाल सतेज पाटील यांनी केला.

हे जर मी बोललो तर चालेल का? सतेज पाटील यांचा हसन मुश्रीफ यांना थेट सवाल
satej patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 3:15 PM
Share

मी सत्तेच्या दाराजवळ जाऊन बसलो नाही. माझ्यावर जातीवादाचा आरोप करताना चार वेळा विचार करायला हवा होता. 15 वर्ष तुम्ही माझ्यासोबत होता. तुम्ही चार वेळा निवडणूक लढवली. पण तुम्हाला दार उघडता आलं नाही. मी होतो म्हणून तुम्हाला गोकुळमध्ये प्रवेश मिळाला, असा दावाच करतानाच माझा मुलगा पडला, माझा मुलगा पडला हे चारवेळा मुश्रीफ म्हणत होते. पण मराठा आणि मातंग समाजातील उमेदवार पडले त्यावर त्यांनी चकार शब्द काढला नाही, हे जर मी बोललो तर चालेल का? असा सवालच आमदार सतेज पाटील यांनी केला. कोल्हापुरात गोकुळवरील संचालकांच्या नियुक्तीविरोधात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला संबोधित करताना सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांना चांगलंच घेरलं.

गोकुळवर प्रशासक आणू नये म्हणून मी वारंवार विनंती केली. जयंत पाटील यांनीही तुम्ही प्रशासक का आणत आहात? असं मुख्यमंत्र्यांना विचारलं होतं. जयंत पाटलांनी त्यांना विधानसभेत विचारलं होतं. त्यावर गोकुळसाठी आम्ही कायदा करत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. पण दुर्देवाने त्यांनी गोकुळसाठी प्रशासक आणला. केवळ गोकुळवर प्रशासक आणण्यासाठी हा कायदा केला गेला. गेल्या सहा महिन्यापासून मी सांगत होतो. या कायद्या विरोधात आम्हाला कोर्टात जावं लागलं. निवडणुका लागाव्यात म्हणून आम्ही प्रयत्न केला. सत्तेत मांडीला मांडू लावून बसणारे फक्त यामागे अदृश्य़ शक्ती आहे, असं म्हणत होते. पण ही अदृश्य शक्ती कोण आहे? हे सांगण्याचं धाडसही मुश्रीफ यांच्यात नव्हतं. तुम्ही सोडून गेला तरी मी घाबरलो नाही. मी मैदानात उतरणारा माणूस आहे, असं सतेज पाटील म्हणाले.

तुम्ही पोराबाळांसाठी लढत होता

जिल्ह्यातील अनेक लोकांनी संघर्षाच्या काळात माझ्या खांद्याला खांदा लावून मला मदत केली. पलिकडे दिग्गज मंडळी होती. तीन तीन मंत्री, खासदार, आमदार जिल्ह्यात ठाण मांडून होते. आम्ही राजू शेट्टींसह लोकांमध्ये गेलो. पायाला भिंगरी लावून फिरलो. प्रत्येत तालुक्यात दोन दिवस राहिलो. मी 22 दिवस अँटिबायोटिक्सवर होतो. कार्यकर्त्याच्या घरी जेवायला गेलो तेव्हा पहिला मजलाही चढता येत नव्हता. मी साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी लढत होतो. तुम्ही तुमच्या पोराबााळांना निवडून देण्यासाठी लढत होता, असा हल्लाच पाटील यांनी चढवला.

आम्ही जातीयवादी पाळणारे लोक नाही

माझे सर्वच्या सर्व 25 उमेदवार हे कार्यकर्ते होते. त्यात माझी पोरं नव्हती. नातेवाईक नव्हते. या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न केला तर जातीवाद कुठून आला? आम्ही शाहू महाराजांच्या पायाजवळ बसलो आहोत. आम्ही जातीवाद पाळणारे लोक नाही. माझा मुलगा पडला… माझा मुलगा पडला… हे चार वेळा म्हटला. पण मातंग समाजाच सुजित मिनचेकर पडला त्यावर काही बोलला नाही. मराठा समाजाचा बापू पडला त्यावर काही बोलला नाही. हे जर मी बोललो तर चालेल का? पण मी म्हणणार नाही. बोलणार नाही, असं पाटील म्हणाले.

Follow Us
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
Manoj Jarange Patil : पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..
Raj Thackeray Speech : महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत परखड भाष्य; नेमकं काय म्हणाले?
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा