Ankita Lokhande: अंकिताला झालंय तरी काय? गणपती आरतीदरम्यानचा व्हिडीओ तुफान चर्चेत
Ankita Lokhande: अभिनेत्री अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत येत आहे. अर्जुन बिजलानीच्या घरी गणपती आरतीदरम्यान अंकिता नेमकं काय करत होती, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे,.

Ankita Lokhande: मुंबईसह देशभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण आपल्या घरी गणरायाची स्थापना करून भक्तिभावाने बाप्पाची आरती करत आहेत. अभिनेता अर्जुन बिजलानीच्या घरीही गणपतीच्या निमित्ताने खास आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरतीला टेलिव्हिजन विश्वातील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेचा उत्साही अंदाज पाहायला मिळत असून, त्यावरून नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत.
अर्जुन बिजलानीच्या घरी झालेल्या गणपती आरतीमध्ये अंकिता लोखंडेही सहभागी झाली होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आरती सुरू असताना अंकिता मोठमोठ्याने काहीतरी बोलताना दिसते. त्यानंतर ती उत्साहात नाचतानाही पाहायला मिळते. गणपतीच्या भक्तीत तल्लीन झालेल्या अंकिताचा हा अंदाज अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अंकिताचा उत्साह पाहून काही चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र तिच्या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये अंकिताच्या वागण्याचीच चर्चा अधिक होताना दिसत आहे.
पहा व्हिडीओ-
अंकिताला झालंय तरी काय, असा सवाल एकाने केला. तर ‘ती ठीक आहे का’, असं दुसऱ्याने म्हटलंय. गणपती बाप्पाची आरती करताना असं कोण करतं, असंही काहींनी लिहिलं आहे. अर्जुन बिजलानीच्या गणपती आरतीला टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सेलिब्रिटी एकमेकांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेताना दिसत आहेत. अर्जुनच्या घरीही कलाकारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या खास प्रसंगातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया पेजवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. गणपती आरतीच्या निमित्ताने कलाकार एकत्र येतात आणि त्यांच्यातील मैत्रीचे क्षणही चाहत्यांना पाहायला मिळतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांमधील सेलिब्रिटींचे व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच चर्चेत येतात.
अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते कामापर्यंतच्या अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आता अर्जुन बिजलानीच्या घरी गणपती आरतीदरम्यानचा तिचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. गणरायाच्या उत्सवात सेलिब्रिटींचा सहभाग आणि त्यांचा उत्साह पाहण्याची चाहत्यांनाही उत्सुकता असते. त्यामुळे अंकिताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.