‘गाडी काळजीपूर्वक चालवा!’, Rishabh Pant च्या भेटीस खास व्यक्ती रुग्णालयात दाखल

कार अपघातानंतर ऋषभ पंतची विचारपूस करण्यासाठी खास व्यक्ती रुग्णालयात दाखल; कुटुंबाची देखील घेतली भेट

गाडी काळजीपूर्वक चालवा!, Rishabh Pant च्या भेटीस खास व्यक्ती रुग्णालयात दाखल
Rishabh-Pant
Image Credit source: social media
| Updated on: Dec 31, 2022 | 10:38 AM

Rishabh Pant accident : भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याचा शुक्रवारी उत्तराखंडच्या रुडकी येथे भीषण अपघात झाला. अपघातात ऋषभच्या गाडी जळून खाक झाली, पण क्रिकेटपटू मात्र बचावला आहे. ऋषभची प्रकृती आता प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांना दिली आहे. एवढंच नाही, तर ऋषभला मुंबईत शिफ्ट करण्यासाठी बीसीसीआयच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, शिवाय गरज भासल्यास क्रिकेटपटूला उपचारासाठी परदेशात नेण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, क्रिकेटपटूच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खास सेलिब्रिटी डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात पोहोचले.

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर क्रिकेटपटूची भेट घेण्यासाठी मॅक्स रुग्णालयात पोहोचले. शनिवारी सकाळी दोघांनी ऋषभची भेट घेतली. यावेळी त्यांनी ऋषभच्या कुटुंबाची देखील भेट घेतली. सोबतच क्रिकेटरच्या प्रकृतीबद्दल कुटुंबाकडे विचारणा केली.

 

 

अनिल आणि अनुपम यांनी रुग्णालातून बाहेर येताच माध्यमांसोबत संवाद साधला आणि ऋषभच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. अनुपम खेर म्हणाले, ‘आता ऋषभची प्रकृती स्थिर आहे. आम्ही येथेच असल्यामुळे देशाचे जबाबदार नागरिक म्हणून ऋषभची भेट घेण्यासाठी आलो. शिवाय ऋषभच्या आई त्यांच्यासोबत देखील संवाद साधला. ऋषभसोबत सध्या त्याचे कुटुंब आहे…’ असं खेर म्हणाले.

‘आम्ही पूर्ण देशाच्या प्रार्थना ऋषभपर्यंत पोहोचवण्यासाठी रुग्णालयात गेलो. त्याला हसवलं, गप्पा देखील मारल्या. तो लवकरच बरा होईल आणि पुन्हा देशासाठी खेळेल..’ असं अनिल कपूर म्हणाले. सध्या संपूर्ण देश ऋषभची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहे.

कार अपघातातून बचावलेल्या ऋषब पंतच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्या आहेत. त्याच्या डोक्याला, कपाळाला, चेहऱ्याला, हाताला, पायाला आणि पाठीला प्रचंड जखमा झाल्या आहेत. त्याच्या चेहरा आणि पाठीवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. तसेच त्याचा एमआयआरही करण्यात आला असून रिपोर्ट नॉर्मल आले आहेत.