
1987मध्ये प्रदर्शित झालेल्या अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी यांच्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपट आजही तेवढाच लोकप्रिय आहे. त्यातील गाणी आणि डायलॉगही तेवढेच प्रसिद्ध आहेत. या चित्रपटातील एक डायलॉग म्हणजे ‘मोगॅम्बो खुश हुआ…’ हा प्रसिद्ध संवाद चाहत्यांना खूप आवडला आणि आजही तो तेवढाच लोकप्रिय आहे. पण हे फास कमी जणांना माहित असेल की मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी अमरीश पुरी नाही तर दुसऱ्याच एका अभिनेता पहिली पसंती होता. मात्र अनिल कपूरने स्वत:च आपल्या मित्राची ही भूमिका काढून घेतली आणि त्यामुळे ही भूमिका अमरीश पुरी यांना देण्यात आली.
हा अभिनेता साकारणार होता मोगॅम्बोची भूमिका
मिस्टर इंडिया चित्रपटातील मोगॅम्बोची खलनायकाची भूमिका अमरीश पुरी यांनी साकारली होती. चाहत्यांना ही भूमिका इतकी आवडली की आजही ती त्यांच्या मनात कोरली आहे. खरंतर, अमरीश पुरींची मोगॅम्बोची ही भूमिका पहिल्यांदा अनुपम खेर यांना ऑफर करण्यात आली होती. टीव्ही चॅट शो ‘कुछ भी हो सकता है’ मध्ये सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान अनुपम खेर यांनी याचा खुलासा केला होता. ते म्हणाले की, “मिस्टर इंडिया चित्रपटातील खलनायक ‘मोगॅम्बो’ची भूमिका पहिल्यांदा मला ऑफर करण्यात आली होती.
भूमिका काढून घेण्यात आली
मात्र एक-दोन महिन्यांनी अनुपम खेर यांना या भूमिकेतून काढून टाकण्यात आले. चित्रपटात अनुपम खेर यांच्याऐवजी अमरीश पुरी यांना ही भूमिका देण्यात आली. तथापि, अनुपम खेर यांनी सांगितले की त्यांना याचा अजिबात पश्चात्ताप नाही कारण ही भूमिका साकारणारा अभिनेता अमरीश पुरी यांनी मिस्टर इंडियामध्ये अद्भुत अभिनय केला होता. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की चित्रपटात त्यांच्याकडून ही भूमिका काढून घेणारा दुसरा कोणी नसून त्यांचा जवळचा मित्र अनिल कपूर होता जो त्या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम करत होता.
अनुपम खेर आणि अनिल कपूर यांची मैत्री
मिस्टर इंडिया चित्रपट त्या काळातील इतका मोठा हिट चित्रपट होता की तो हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. अनुपम खेर आणि अनिल कपूर यांच्या मैत्रीचे उदाहरण चित्रपटसृष्टीत दिले जाते. दोन्ही कलाकारांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनुपम खेर, सतीश कौशिक आणि अनिल कपूर हे त्रिकूट बॉलीवूड जगतात खूप प्रसिद्ध होते.