Anushka Sharma | करिना कपूर-खानची उचलबांगडी, अनुष्का शर्मा ‘प्रेगा न्यूज’ची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर!

Anushka Sharma | करिना कपूर-खानची उचलबांगडी, अनुष्का शर्मा ‘प्रेगा न्यूज’ची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर!

प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Dec 01, 2020 | 8:39 PM

मुंबई : प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. पूर्वी त्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करिना कपूर खान होती. यावेळी कंपनीने करिना ऐवजी अनुष्काची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले आहे. करिना ऐवजी अनुष्काला कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. (Anushka Sharma New Brand Ambassador of Prega News)

या बदलाचे एक कारण असेही असु शकते की अनुष्का पहिल्यांदाच आई होणार असल्यामुळे तिच्या प्रेग्नन्सीबद्दल मीडियामध्ये जास्त चर्चा आहे. ‘प्रेगा न्यूज’ होम प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. अनुष्का जानेवारी 2021मध्ये बाळाला जन्म देणार आहे. प्रेगा न्यूजची ही नवी जाहिरात विविध टेलिव्हिजन चॅनेल्स, डिजिटल प्लॅटफॉर्मवरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे. त्याबरोबर हिंदी, बंगाली, उड़िया, मराठी, गुजराती, पंजाबी आणि आसामी या प्रादेशिक भाषांमध्येही प्रदर्शित केली जाणार आहे. या जाहिरातीमध्ये अनुष्का प्रेग्नन्सीमध्ये एक आई होण्याच्या स्वप्नाचा आनंद घेताना दिसणार आहे. याबद्दल बोलताना मॅनकाइंड फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जुनेजा म्हणाले की, अनुष्का शर्मा यांना हा मातृत्व शक्तीचा प्रभावी संदेश देण्यात मदत केल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. अनुष्का शर्मा याबद्दल बोलताना म्हणाली की, ‘प्रेगा न्यूज बरोबर काम करण्याचा मला आनंद आहे.’ अनुष्का पुढे म्हणाली की, ‘प्रेगा न्यूज म्हणजेच गुड न्यूज’. हीच या ब्रँडची टॅगलाईनदेखील आहे. अनेक माता प्रेगा न्यूज बरोबर जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी प्रेगा न्यूज सोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. चित्रपटांतून ब्रेक अनुष्का शर्माने ‘पीके’, ‘बँड बाजा बारात’, ‘सुलतान’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ अशा चित्रपटांमध्ये आपल्या बहारदार अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे. याचबरोबर अनुष्का शर्मा ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसची भागीदार देखील आहे. नुकतीच तिची निर्मिती असलेला ‘बुलबुल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर, तर ‘पाताल-लोक’ ही वेब सीरीज ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. अनुष्का शर्मा 2018मध्ये शाहरूख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात झळकली होती. यानंतर तिने सगळ्या कामांतून ब्रेक घेतला आहे.

संबंधित बातम्या :

Virushka | प्रेग्नंट अनुष्काचं शीर्षासन, विराटचा भक्कम आधार

Virat Anushka | विराटही विचारतो ‘जेवलीस का?’, मैदानातून अनुष्काला खाणाखुणा

(Anushka Sharma New Brand Ambassador of Prega News)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें