Virushka | प्रेग्नंट अनुष्काचं शीर्षासन, विराटचा भक्कम आधार

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:45 PM, 1 Dec 2020

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोमध्ये अनुष्का शर्मा शीर्षासन करताना दिसत असून, विराट कोहली (Virat Kohli) तिला मदत करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे या फोटोतही अनुष्काने ‘बेबी बंप’ फ्लाँट केला आहे. तर, तिच्या या वर्क आऊटमध्ये विराट तिची खूप काळजी घेताना दिसत आहे (Anushka Sharma Doing shirshasan with Virat Kohli Photo gone viral).

वर्क आऊट फोटो शेअर करत अनुष्का लिहिते, ‘हा हात खाली पाय वर करण्याचा सगळ्यात कठीण व्यायाम आहे. योगा हा माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे. माझ्या डॉक्टरांनी देखील मला सांगितले की, मी जास्त ताण पडणारी किंवा जास्त वाकायला लागणार नाही, अशी सर्व आसने करू शकते. परंतु, योग्य त्या सगळ्या सावधानीसहच… मी अनेक वर्षांपासून करीत असलेल्या हेडस्टँडसाठी, भिंत आधार म्हणून वापरली आहे. तर, माझा खंबीर पती मला संतुलन साधण्यास आणि अधिक सुरक्षेसाठी मदत करतो आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

(Anushka Sharma Doing shirshasan with Virat Kohli Photo gone viral)

योगा ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम

पुढे अनुष्काने लिहिले की, ‘मी हे माझ्या योगा ट्रेनरच्या देखरेखीखाली केले. जे प्रत्येक वर्कआऊट वेळी माझ्यासोबत संपर्कात होते. गर्भधारणेदरम्यानही योगा सराव चालू असल्याने मला खूप आनंद झाला आहे.’ अवघ्या 12 मिनिटांत 3 लाखाहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पहिल्यांदाच आई-वडील होणार आहेत.

पहिल्यांदाच आई-वडील बनत असल्याने आनंदित असणारे विरुष्का खूप काळजी घेत आहे. अनुष्का सध्या 8 महिन्यांची गर्भवती आहे. या काळात ते दोघेही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत. अनुष्का शर्मा गरोदरपणातही सोशल मीडियावर सक्रिय राहिली आहे. ती शक्य तितके वेळ आपले रुटीन फॉलो करत आहेत. याकाळातही ती आपल्याकडे कसोशीने लक्ष देत आहे (Anushka Sharma Doing shirshasan with Virat Kohli Photo gone viral).

चित्रपटांतून ब्रेक

अनुष्का शर्माचा हा फोटो सध्या खूप चर्चेत आहे. यावर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनुष्का शर्माने ‘पीके’, ‘बँड बाजा बारात’, ‘सुलतान’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ अशा चित्रपटांमध्ये आपल्या बहारदार अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे. याचबरोबर अनुष्का शर्मा ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसची भागीदार देखील आहे. नुकतीच तिची निर्मिती असलेला ‘बुलबुल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर, तर ‘पाताल-लोक’ ही वेब सीरीज ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. अनुष्का शर्मा 2018मध्ये शाहरूख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात झळकली होती. यानंतर तिने सगळ्या कामांतून ब्रेक घेतला होता.

(Anushka Sharma Doing shirshasan with Virat Kohli Photo gone viral)