...म्हणून रोहित शर्माने अनुष्काला अनफॉलो केलं!

'हिटमॅन' रोहित शर्माने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘अनफॉलो’ केल्याची माहिती आहे. त्यामुळे टीम इंडियातील अंतर्गत वाद हा आता त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे.

Rohit Sharma unfollows Anushka Sharma from Instagram, …म्हणून रोहित शर्माने अनुष्काला अनफॉलो केलं!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात ताटातूट झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विश्वचषकात संघाच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात मतभेद सुरु असल्याची माहिती आहे. त्याच वेळी आता आणखी एक माहिती समोर येत आहे. ‘हिटमॅन’ रोहित शर्माने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘अनफॉलो’ केल्याची माहिती आहे. त्यामुळे टीम इंडियातील अंतर्गत वाद हा आता त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचला आहे.

रोहित शर्माने यापूर्वी विराटलाही इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. यानंतर, ‘एक समजूतदार व्यक्तीने एकेकाळी म्हटलं – सत्याला कधीही खोटेपणा लपवू शकत नाही’, असा मेसेज अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला.

दुसरीकडे, विराट कोहली अजूनही रोहितला फॉलो करतो, पण तो रोहितची पत्नी रितिका सजदेहला फॉलो  करत नाही. तर अनुष्का ही रोहित आणि रितिका दोघांनाही फॉलो करते. रितिका मात्र विराट आणि अनुष्का या दोघांनाही फॉलो करत नाही. रोहित शर्माचे इन्स्टाग्रामवर एक कोटीहून जास्त फोलोवर्स आहेत, तर तो केवळ 95 जणांना फॉलो करतो.

प्रशासक समिती (सीओए) ने मात्र विराट आणि रोहितमधील या वादाला नाकारलं आहे. ‘हे प्रकरण तुम्ही लोकांनी (मीडिया) तयार केलं आहे’, असं सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी पीटीआयला सांगितलं.

2019 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर रोहित आणि विराटमधील हे मतभेद चह्वाट्यावर आले. तसेच, संघात दोन गट झाल्याचंही सांगण्यात येत होतं. तर काही वर्षांपूर्वी रोहित आणि शिखर धवनने विराटशी संबंधित मॅनेजमेंट कंपनीही सोडली होती. त्यामुळे या दोन खेळांडूंमधील वाद हा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

 

View this post on Instagram

 

Seal the silly moments ❣️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *