Ind Vs Ban T20 World Cup: विराटच्या बॅटिंगवर अनुष्का फिदा, दिली अशी Reaction

विराट कोहलीची रेकॉर्डतोड कामगिरी पाहून अनुष्काने व्यक्त केलं प्रेम

Ind Vs Ban T20 World Cup: विराटच्या बॅटिंगवर अनुष्का फिदा, दिली अशी Reaction
Virat Kohli and Anushka Sharma
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 02, 2022 | 6:10 PM

मुंबई- बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावलं. विराटने नाबाद 64 धावा केल्या. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये विराटने आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवली आहे. विराटची ही खेळी पाहून त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. मॅचमधील विराटचा फोटो पोस्ट करत तिने प्रेमाचा वर्षाव केला आहे.

अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विराटचा सामन्यातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर तीन हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. अर्धशतक झळकावताना विराटने टी 20 वर्ल्ड कपमधला एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो टॉपवर आहे.

अनुष्कासोबतच विराटचे चाहतेसुद्धा सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत. ट्विटरवर विराट ट्रेंड होऊ लागला आहे. पतीच्या प्रत्येक दमदार कामगिरीवर अनुष्का नेहमीच प्रतिक्रिया देताना, त्याची साथ देताना आणि त्याचं कौतुक करताना दिसते. याआधी जेव्हा भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला, तेव्हासुद्धा अनुष्काने विराटसाठी भावूक पोस्ट लिहिली होती. त्या सामन्यात विराटने नाबाद 82 धावा झळकावल्या होत्या.

विराटने टी- 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये तिसरं अर्धशतक झळकावलं आहे. याआधी नेदरलँडविरुद्धच्या सामान्यात त्याने 62 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 82 धावा केल्या होत्या.

टी-20 वर्ल्ड कप सुरू झाल्यापासून विराट फॉर्ममध्ये आहे. याला अपवाद फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना होता. आजच्या सामन्यात केएल राहुल आणि विराटने मिळून डाव सावरला. सेमीफायनलमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने आजची मॅच टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील पुढचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी टीम इंडियाला आज सामना जिंकावाच लागेल. टीम इंडियाने 6 विकेट्स गमावून 184 धावा केल्या आहेत. बांग्लादेशला विजयासाठी 185 धावांची गरज आहे.