‘आम्ही एकमेकांसाठी…’, मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यावर अर्जुन कपूर याचा मोठा खुलासा

| Updated on: Jan 17, 2023 | 1:07 PM

गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांना डेट करत आहेत, अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, पण आता अर्जुनने त्यांच्या नात्याबद्दल केला मोठा खुलासा

आम्ही एकमेकांसाठी..., मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यावर अर्जुन कपूर याचा मोठा खुलासा
'आम्ही एकमेकांसाठी...', मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यावर अर्जुन कपूर याचा मोठा खुलासा
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर स्टारर ‘कुत्ते’ सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिनेमाला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सिनेमात अर्जुन कपूर एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत अर्जुनने बहिण जान्हवी कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्याबद्दल मोठा खुसाला केला. मुलाखतीनंतर अर्जुन त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मुलाखतीत अर्जुन जान्हवी आणि मलायका यांच्याबद्दल काय म्हणाला हिच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

मुलाखाती दरम्यान अर्जुन जान्हवी हिच्याबद्दल म्हणाला, ‘जान्हवीला तिच्यामध्ये असलेल्या क्षमतांबद्दल फार कमी माहिती आहे. अनेकदा जान्हवी स्वतःला असुरक्षित असल्याचं भासवते. ती कायम काही न काही शोधण्याच्या प्रयत्नात असते. एवढंच नाही, तर जान्हवी कधीही कोणासमोरही बोनी कपूर यांची मुलगी असल्याचं सांगत नाही.’

 

 

पुढे बहिणीबद्दल जान्हवी म्हणाला, ‘तुम्हाला अनेक ठिकाणा ठाम निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा जान्हवी कोणताही धोका पत्कारण्यासाठी तयार असते. मिली, गुंजन सक्सेना यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका करत जान्हवीने स्वतःची नवीन ओळख तयार केली आहे आणि इंडस्ट्रीमध्ये तिचं भविष्य उज्वल असणार आहे.’ असं देखील अर्जुन म्हणाला.

गर्लफ्रेंड मलायका अरोराबद्दल काय म्हणाला अर्जुन कपूर

अर्जुन म्हणाला, ‘मलायका माझ्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती आहे, जी मला कायम सांगते आपलं सर्वात जवळचं नातं जमीनीसोबत आहे. मलायका माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला स्वतःमध्ये कोणतेही बदल करावे लागले नाहीत, आम्ही दोघे एकमेकांसाठी फिट आहोत.’

पुढे अर्जुन म्हणला, ‘समाजासाठी आमचं नातं अनोखं असलं तरी, माझ्या आयुष्यातील आनंदाचं कारण मलायका आहे.’ मलायका आणि अर्जुन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी त्यांच्या नात्यांची कबुली देखील सर्वांसमोर दिली. मलायका आणि अर्जुन यांनी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं.