
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor)व अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora)हे लव्ह बर्ड बी टाऊन मध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे. दोघेही वेगवेगळया कारणांनी चर्चेत असतात. हे दोघेही सोशल मीडियावर(Social media) खूप सक्रिय असून अनेक अपडेट ते चाहत्यांच्या सोबत शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि मलायका पॅरिस ट्रिपला गेले होते. त्यानंतर तिथले फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. जेव्हापासून अर्जुन आणि मलायका यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले आहे, तेव्हापासून दोघेही एकमेकांचे अनेक फोटो शेअर करताना दिसतात. आता अर्जुन कपूरने नुकताच मलायकासोबत पॅरिस ट्रिपचा एक फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर दोघांचेही स्वतंत्र फोटो पोस्ट करत अर्जुनने एका प्रश्नविचारला आहे. आणि मलायकाचा फोटो वेगळा आहे.
अर्जुनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी पहिल्या फोटोमध्ये अर्जुन दिसत आहे. फोटोमध्ये अर्जुन एका रेस्टॉरंटमध्ये बसला आहे, त्याने टोपी घातली आहे आणि कानाकडे पाहत आहे. दुसरीकडे अर्जुनने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मलायका समोर दिसत आहे जो बाजूला पाहत आहे. त्याने या पोस्टला Who wore em better ??? Swipe right to know my answer !!! ? असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.
त्याच्या पोस्टवर मलायकाने कमेंट करता उत्तर दिले आहे. मलायकाने कमेंट करत म्हटले की Hmmmmm me ? . याबरोबरच इतर अनेक कलाकारांनीही त्यावर कमेंट करत पोस्ट लाईक केली आहे. अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.