Anshula Kapoor | अर्जुन कपूर याची बहीण अंशुला झाली भावूक, म्हणाली, 32 वर्षांमध्ये पहिल्यांदाच वडिलांनी…

अर्जुन कपूर याची बहीण अंशुला कपूर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. विशेष म्हणजे अंशुला कपूर हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. अंशुला कपूर ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. अंशुलाचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.

Anshula Kapoor | अर्जुन कपूर याची बहीण अंशुला झाली भावूक, म्हणाली, 32 वर्षांमध्ये पहिल्यांदाच वडिलांनी...
| Updated on: Jul 06, 2023 | 9:59 PM

मुंबई : बोनी कपूर यांची मोठी मुलगी आणि अर्जुन कपूर (Anshula Kapoor) यांची बहीण अंशुला कपूर ही बाॅलिवूडपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही अंशुला कपूर ही नेहमीच चर्चेत असते. अंशुला कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असून तिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अंशुला कपूर (Anshula Kapoor) ही नेहमीच सोशल मीडियावर आपल्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे याची माहिती शेअर करताना दिसते. अंशुला कपूर ही सध्या रोहन ठक्कर याला डेट करत आहे. अंशुला कपूर ही कायमच रोहन ठक्कर याच्यासोबत खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करते. रोहन ठक्कर याचे शिक्षण पुण्यामध्ये झाले असून गेल्या काही वर्षांपासून हे रिलेशनशिपमध्ये आहेत.

नुकताच अंशुला कपूर हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे अंशुला कपूर ही चर्चेत आलीये. विशेष म्हणजे अंशुला कपूर हिच्या या व्हिडीओवर छोटी बहीण जान्हवी आणि खुशी कपूर यांनी देखील रिप्लाय केलांय. अंशुला कपूर हिने शेअर केलेला हा व्हिडीओ लंडनमधील आहे. या व्हिडीओमध्ये अंशुला कपूर ही खूप जास्त खुश दिसत आहे.

अंशुला कपूर हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बोनी कपूर हे देखील दिसत आहेत. विशेष म्हणजे बोनी कपूर हे चक्क किचनमध्ये काम करताना दिसत आहेत. बोनी कपूर हे आपल्या लेकीसाठी नाश्ता तयार करत आहेत. यानंतर अंशुला कपूर हा नाश्ता खाताना देखील दिसत आहेत. अत्यंत भावनिक होत अंशुला कपूर हिने ही पोस्ट लिहिली आहे.

अंशुला कपूर हिने पोस्ट शेअर करत म्हटले की, 32 वर्षांमध्ये पहिल्यांदा वडिलांनी माझ्यासाठी नाश्ता तयार केला आहे. विशेष म्हणजे एकदम चवदार झालाय. त्यांना इतका चांगला नाश्ता बनवता येतो हेच मला मुळात माहिती नव्हते. लंडनमधील या खूप जास्त सुंदर आठवणी असल्याचे देखील अंशुला कपूर हिने म्हटले आहे.

अंशुला कपूर हिने तिचे वजन खूप जास्त कमी केले आहे. अंशुला कपूर हिने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, एकेकाळी आरशामध्ये मला स्वत: ला बघण्याची हिंमत माझ्यामध्ये नव्हती. अंशुला कपूर हिने थेट म्हटले होते की, स्ट्रेच मार्क्स लपवण्याची अजिबात गरज नाहीये. अंशुला कपूर हिने बिकिनीवरीलही फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केले होते.