अर्जुन तेंडुलकर याची नव्या आयुष्याची सुरुवात… किती वर्ष मोठ्या मुलीसोबत थांटलाय संसार? जाणून व्हाल थक्क

Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: सचिन तेंडुलकरचा मुलाचा अर्जुन तेंडुलकर याने 'लेडीलव्ह'सोबत संसार थाटला, दोघांनी वयाचं अंतर किती, किती वर्ष वर्ष मोठी आहे अर्जुन याची बायको? जाणून व्हाल थक्क...

अर्जुन तेंडुलकर याची नव्या आयुष्याची सुरुवात... किती वर्ष मोठ्या मुलीसोबत थांटलाय संसार? जाणून व्हाल थक्क
Arjun Tendulkar and Saaniya Chandhok
| Updated on: Mar 06, 2026 | 10:47 AM

Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहत आहेत. अशात नुकताच भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचं देखील लग्न झालं आहे. अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पाडला… गुरुवारी म्हणजे 5 मे रोजी अर्जुन याने ‘लेडी लव्ह’ सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न केलं. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्यासोबत जय शाह देखील लग्नात उपस्थित होते. सध्या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सांगायचं झालं तर, ऑगस्ट 2025 मध्ये अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा झाला… आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सानिया आणि अर्जुन एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहेत. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी देखील मारली. व्हिडीओमध्ये अर्जुन याचे वडील सचिन तेंडुलकर आणि आई अंजली तेंडुलकर देखील दिसत आहेत. व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे…

 

 

अर्जुन याच्यापेक्षा किती वर्ष मोठी आहे सानिया

अर्जुन आणि सानिया यांच्यामध्ये एक वर्षांचं अंतर आहे. अर्जुन तेंडुलकर याचा जन्म 24 सप्टेंबर 1999 मध्ये झालेला. तर, सानिया चंडोक हिचा जन्म 23 जून 1998 मध्ये झालेला. सानिया, अर्जुन याच्या पेक्षा एक वर्षांनी मोठी आहे. सांगायचं झालं तर, अंजली देखील सचिन यांच्यापेक्षा मोठ्या आहेत. सचिन आणि अंजली यांच्यामध्ये जवळपास 5 वर्षांचं अंतर आहे… सचिन आणि अंजली यांचं लग्न 24 मे 1995 मध्ये झालं होतं.

अर्जुन आणि सानिया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. अखेर 5 मार्च रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे दोघांनी पारंपरिक विधींमध्ये विवाहबंधनात अडकत आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

सानिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती प्रसिद्ध उद्योजक रवी घाई यांची नात आहे. सानिया ही पेशाने टोक्निशियन आहे आणि मुंबईतील Mr. Pawas Pet Spa and Store LLP या संस्थेची संचालक आणि पार्टनर देखील आहे.

Follow Us