Bollywood | अभिनेत्रीने खाल्लेल्या अर्ध्या सफरचंदाचा लागला लिलाव; कोण होती ‘ती’ अभिनेत्री?

Bollywood | 'या' अभिनेत्रीने खाल्लेल्या अर्ध्या सफरचंदाचा लागला लिलाव..., कोण होती 'ती' अभिनेत्री? पण तिच्या हृदयद्रावक निधनाने सर्वत्र खळबळ... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा... तिला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं, पण खासगी आयुष्य होतं प्रचंड खडतर

Bollywood | अभिनेत्रीने खाल्लेल्या अर्ध्या सफरचंदाचा लागला लिलाव; कोण होती ती अभिनेत्री?
| Updated on: Sep 24, 2023 | 2:29 PM

मुंबई : 24 सप्टेंबर 2023 | आतापर्यंत तुम्ही अभिनेत्रीच्या साड्या, दागीने, महागड्या वस्तूंच्या लिलावाबद्दल ऐकलं असेल. पण तुम्ही कधी अभिनेत्रीने अर्ध्या खाल्लेल्या सफरचंदाच्या लिलावाबद्दल ऐकलं आहे? कदाचित नसेल ऐकलं… पण फक्त बॉलिवूड नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळावलेल्या अभिनेत्रीने खाल्लेल्या अर्ध्या सफरचंदाचा लिलाव लागला होता. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहेत तिने खासगी आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला. पण तिने कधीही मागे वळून पाहिलंन नाही. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीने स्क्रिन शेअर केली आणि प्रसिद्धी मिळवली..

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सिल्क स्मिता आहे. यश मिळवण्यासाठी अभिनेत्रीने प्रचंड मेहनत घेतली. तिच्याबद्दल आजही अनेक गोष्टी समोर येत असतात. रिपोर्टनुसार, सिल्क स्मिता एका सिनेमाचं शुटिंग करत होती. ब्रेक दरम्यान अभिनेत्रीने सफरचंद उचलला आणि खाल्ला.

अभिनेत्री सफरचंद खात असताना अचानक तिला एका शॉटसाठी बोलावण्यात आलं. तेव्हा अभिनेत्रीने खाल्लेल्या अर्ध्या सफरचंदाकडे एका व्यक्तीची नजर गेली आणि तो सफरचंद घेवून तेथून पळून गेला. त्यानंतर त्या व्यक्तीने अभिनेत्रीने अर्ध्या खाल्लेल्या सफरचंदाचा लिलाव लावला. सफरचंदाचा लिलाव करून अभिनेत्याला किती पैसे मिळाले याबद्दल अनेक चर्चा रंगल्या…

अभिनेत्रीने खाल्लेल्या सफरचंदाचा लिलाव 2 रुपयांना झाल्याचा दावा काही लोक करतात, तर काहींनी सफरचंद सुमारे 200 रुपयांना विकल्याचा दावा केला. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटलं आहे की, सफरचंदाचा लिलाव 26,000 रुपये किंवा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीत लागला… पण यावर कोणीही अधिकृत घोषणा केली नाही. यावरुन कळतं अभिनेत्रीची लोकप्रियता किती होती.

दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीने संपवलं स्वतःचं आयुष्य

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने एका डॉक्टरसोबत लग्न केलं. पण दुसऱ्या लग्नात देखील अभिनेत्री आनंदी नव्हती. अखेर २३ सप्टेंबर १९९६ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य संपवलं. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना अभिनेत्रीने लिहिलेलं शेवटचं पत्र मिळालं. ज्यामध्ये अभिनेत्रीने मी माझ्या आयुष्यात आनंदी नाही.. असं लिहिलं होतं.