ती तुझी वहिनी आहे, तिला हातही लावू नकोस; संजय दत्तला थेट अंडरवर्ल्डकडून आली होती धमकी, नेमकं काय घडलं?

नुकताच दिग्गज लेखक एस. हुसैन जैदी यांनी बॉलिवूडमधील अंडरवर्ल्डच्या दबदाब्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी संजय दत्तला आलेल्या धमकीचा किस्सा सांगितला आहे. आता नेमकं काय घडलं होतं? वाचा...

ती तुझी वहिनी आहे, तिला हातही लावू नकोस; संजय दत्तला थेट अंडरवर्ल्डकडून आली होती धमकी, नेमकं काय घडलं?
Sanjay Dutt and Dawood
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 11:24 AM

एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड मोठ्या प्रमाणात अंडरवर्ल्डच्या दबावाखाली होते. त्या काळात अंडरवर्ल्डची इतकी भीती होती की चित्रपटाच्या बजेट, स्टारकास्टपासून डिस्ट्रिब्युशनपर्यंत… प्रत्येक ठिकाणी त्यांचा हस्तक्षेप असायचा. तुम्हाला माहीत आहे का की बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला देखील अंडरवर्ल्डमधून थेट धमकी देण्यात आली होती. त्याला सांगण्यात आले होते की तो काम करत असलेली अभिनेत्री त्याची वहिनी आहे. तिला स्पर्शही करु नको असे म्हटले होते.

लेखक हुसैन जैदी यांनी अलीकडे गलट्टा इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमधील अंडरवर्ल्डच्या हस्तक्षेपाबाबत खुलेपणाने वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की एका काळात अंडरवर्ल्डचा प्रभाव दिग्दर्शक आणि हिरोच्या कास्टिंगपर्यंत पोहोचला होता.

Loading...

वाचा: 44 वर्षांपूर्वीचे ते गाणं थेट GTA 6 मध्ये, अचानक कशी मिळाली प्रसिद्धी?

राजीव राय आणि मोनिका बेदीशी संबंधित किस्सा

हुसैन जैदी यांनी अंडरवर्ल्डच्या प्रभावाचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण दिग्दर्शक राजीव राय आणि त्यांचा सिनेमा ‘प्यार इश्क मोहब्बत’चे दिले. त्यांच्या मते, राजीव राय सिनेमामध्ये मोनिका बेदीला घेऊ इच्छित नव्हते, पण अबू सलेमच्या बाजूने त्यांना इतक्या धमक्या मिळाल्या की नाइलाजाने मोनिकाची भूमिका टाकावी लागली आणि सिनेमामध्ये तिची भूमिकाही वाढवावी लागली. जैदी यांच्या मते, त्यानंतर राजीव राय यांचे चित्रपट बनवण्यापासून मनच उडाले, त्यांनी नकार दिल्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्नही झाला. त्यानंतर ते देश सोडून गेले आणि आता परतले आहेत.

या घटनेवर प्रश्न उपस्थित करताना हुसैन जैदी म्हणाले की ज्यांनी ‘गुप्त’ आणि ‘मोहरा’ सारख्या शानदार फिल्मा बनवल्या आहेत, त्यांना एक लव्ह स्टोरी बनवून इतक्या धमक्या का सहन कराव्या लागल्या? जेव्हा चित्रपटात मोनिका बेदी सारखे कोणतेच पात्र नव्हते तरी शेवटी दिग्दर्शकाला अबू सलेमची धमकी सहन करावी लागलीना?

संजय दत्त आणि कास्टिंगमध्ये अंडरवर्ल्डचा हस्तक्षेप

जैदी यांनी संजय दत्त, मोनिका बेदी, गोविंदा आणि ट्विंकल खन्ना यांच्या फिल्मचा उल्लेख करताना सांगितले की संजय दत्तला थेट धमकी देण्यात आली होती की मोनिका बेदी त्याची वहिनी आहे. म्हणून तिच्याकडे डोळे वर करून पाहायचे नाही, तिला स्पर्श करायचा नाही आणि डान्स नीट करायचा. त्यांच्या मते, संजय दत्तला ही गोष्ट खटकत होती की गोविंदाला ट्विंकल खन्ना सारखी मोठी हिरोइन मिळत आहे आणि त्याला मोनिका बेदी. त्या काळातही संजय गोविंदापेक्षा मोठा होता. जैदी म्हणाले की संजयच्या मनात ही गोष्ट कायमच राहिली. त्याने तक्रारपण केली. पण यावरून हे स्पष्ट दिसते की अंडरवर्ल्डचा हस्तक्षेप कास्टिंगपर्यंत पोहोचला होता. मात्र, फिल्ममध्ये संजय दत्तने केवळ वहिनी नव्हे, तर बहीण मानूनच काम केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us