ना चित्रपटात, ना मोठा गाजावाजा; तरीही दशकांपासून आजच्या झेन- जी रसिकांपर्यंत मनात घर करून आहे हे भावगीत
काही गाणी अशी असतात, जी ऐकताना नकळत मन जुन्या आठवणींमध्ये हरवून जातं. एकं साधसुद निर्मळ निसर्गाचं सौंदर्य आणि अजरामर झालेलं हे गाणं . दशकांपासून आजच्या जेन - झी रसिकांपर्यंत मनात घर करून आहे हे भावगीत

काही गाणी अशी असतात, जी ऐकताना नकळत मन जुन्या आठवणींमध्ये हरवून जातं. एकं साधसुद निर्मळ निसर्गाचं सौंदर्य आणि अजरामर झालेलं हे गाणं. आकाशात एका रांगेत उडणारे पांढरे शुभ्र बगळे, हिरवंगार निसर्ग आणि मनात दडलेल्या प्रेमाच्या आठवणी… या सगळ्यांचं सुंदर चित्र डोळ्यांसमोर उभं करणारं गाणं म्हणजे बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात….अनेक वर्षांपासून हे मराठी भावगीत आजही रसिकांच्या मनावर राज्य करतं. विशेष म्हणजे कोणत्याही चित्रपटाचा आधार नसतानाही या गाण्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
या गाण्याचे शब्द कवी वा.रा. कांत यांनी लिहिले आहेत. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी या कवितेला संगीत दिलं. तर पंडित वसंतराव देशपांडे यांनी आपल्या खास आवाजात हे गाणं गायलं. शब्द, संगीत आणि आवाज यांचा सुंदर संगम या गाण्यात पाहायला मिळतो. हे कोणत्याही चित्रपटातील गाणं नसून स्वतंत्र भावगीत आहे.
कशी सूचली बगळ्यांच्या माळेची कल्पना
या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील निसर्गाचं वर्णन आणि त्यामागे दडलेली विरहाची भावना. आकाशात उडणाऱ्या बगळ्यांच्या थव्याकडे पाहताना कवीला फुलांच्या माळेची कल्पना सुचते. पण या दृश्यासोबत जोडलेल्या आहेत.त्या जुन्या प्रेमाची आठवणी. पूर्वी एकत्र फिरताना पाहिलेली तीच बगळ्यांची माळ आजही आकाशात दिसते आहे. मात्र ते दृश्य एकत्र पाहणारी व्यक्ती आता सोबत नाही.
गाण्याच्या काही ओळींमध्ये पावसाचे थेंब, ओलं रान, नारळीच्या झाडाखाली झालेल्या गप्पा, पौर्णिमेसारखे डोळे आणि संध्याकाळी बगळ्यांचे थवे मोजण्याचे क्षण आठवतात. प्रत्येत दृश्यातून जुन्या भेटींची आठवण जागी होते. शेवटी नात्याचे धागे तुटल्यानंतर मनात उरलेली हुरहुरही या गीतातून व्यक्त होते.
चित्रपटात नसतानाही रसिकांच्या मनावर राज्य
या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. अनेक गायकांनी आपल्या कार्यक्रमांमधून आणि सादरीकरणातून हे गीत पुन्हा रसिकांसमोर आणले. शंकर महादेवन, राहूल देशपांडे आणि पुष्करलेले यांसारख्या गायकांनीही हे गाणं सादर केलं म्हणून या गाण्याला पुनरूज्जीवन मिळालं आहे.
चित्रपटातील गाणं नसतानाही अनेक वर्षे रसिकांच्या ओठांवर राहिलेलं हे भावगीत मराठी संगीतविश्वातील एक खास स्थान टिकवून आहे. काळ बदलला,गाण्यांच्या शैली बदलल्या पण बगळ्यांची माळ फुले… ऐकलं की जुन्या प्रेमाच्या आठवणी मनातली हुरहुर आजही तितकीच जीवंत होते.