बँकॉकहून परतल्यानंतर भारती सिंग आजारी पडली; तापाने फणफणली; कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह बँकॉकहून परतल्यानंतर आजारी पडली आहेत. तिला सतत ताप येत असून तिची तब्येत बिघडली आहे. तिने स्वतःच्या YouTube व्लॉगमध्ये याबाबत माहिती दिली आहे. तिला चाहत्यांनी त्यांना कोविड टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग तिच्या यूट्यूब व्हीलॉगद्वारे चाहत्यांसोबत तिच्या दैनंदिन जीवनातील अनेक अपडेट शेअर करत असते. भारतीने अलीकडेच एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामुळे चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे. भारतीने म्हटलं आहे की ती आजारी पडली असून तिला सतत ताप येत आहे.
बँकॉकहून परतल्यानंतर भारती सिंग पडली आजारी
व्लॉगमध्ये भारतीने सांगितले की “बँकॉकहून परत आल्यापासून मला सुस्ती आणि अस्वस्थता जाणवत होती. म्हणून, हर्षने माझी रक्त तपासणी करण्याचा निर्णय घेतला,”. पण हे सांगत असताना भारती व्हिडिओमध्ये इंजेक्शन घेण्याच्या विचाराने भावनिक होताना दिसत आहे आणि ती रडू लागते. तथापि, व्हिडिओमध्ये ती पुन्हा रक्त तपासणी करताना दिसत आहे. भारतीला रक्त तपासणी करताना पाहून तिचा मुलगाही आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहे.
चाहत्यांना नियमित पूर्ण शरीर तपासणी करण्याचे आवाहन
भारतीने तिच्या व्लॉगमध्ये प्रेक्षकांना नियमित रक्त तपासणी आणि पूर्ण शरीर तपासणीला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. भारतीला दुसऱ्या दिवशी संपूर्ण आरोग्य तपासणी करायला सांगितलं. भारती यांनी सर्वांना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीने पुढे सांगितले की तिने याआधीच तिच्या दिनचर्येत 70% सुधारणा केली आहे आणि ती हळूहळू तिची जीवनशैली बदलणार आहे. वाटचाल करत आहे. तिच्या दैनंदिन सवयींबद्दल बोलताना भारती म्हणाली की तिने आता झोपण्याच्या वेळेचंही एक वेळापत्रक ठरवलं आहे त्यानुसार ती आणि तिचा लेक गोला दोघेही रात्री 10.30 पर्यंत झोपी जातात.
कोरोना तपासणी करण्याचा सल्ला
दरम्यान सध्या भारतीची तब्येत सारखी बिघडत असून तिला सारखा ताप येत आहे. हे थकव्यामुळे होत असल्याचं त्यांनी अंदाज लावला आहे. भारतीची तब्येत बिघडल्याने तिच्या घरातील काम करणारी रूपाने भारतीसाठी मोरिंगा सूप बनवलेलं व्हिडीओमध्ये दिसत आहे.चाहत्यांनी भारतीला तिची कोरोना तपासणी करण्याचा सल्ला दिला.
bharti singh fever
भारती सिंगच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास
भारती आणि हर्ष अलीकडेच समर्थ जुरेल, अभिषेक कुमार, नीरज गोयत आणि इतर काही सेलिब्रिटींसोबत एका शोच्या शूटिंगसाठी थायलंडला गेले होते. भारती सध्या लाफ्टर शेफ्स सीझन 2 होस्ट करताना दिसत आहे. लाफ्टर शेफ्स व्यतिरिक्त, ती पती हर्ष लिंबाचियासोबत एक पॉडकास्ट शो देखील होस्ट करत असून तिचा हा शो दिवसेंदिवस लोकप्रिय बनत चालला आहे.