आत्महत्येच्या एका दिवसाआधी फेसबुक लाईव्ह, दुसऱ्या दिवशी भोजपुरी अभिनेत्रीचा गळफास

अनुपमा पाठक हिने आपली अॅक्टिव्हा गाडी लॉकडाऊनच्या काळात तिने गावाकडे जाताना आपल्या मित्राला दिली (Bhojpuri Actress Anupama Pathak Suicide) होती.

आत्महत्येच्या एका दिवसाआधी फेसबुक लाईव्ह, दुसऱ्या दिवशी भोजपुरी अभिनेत्रीचा गळफास
Follow us
| Updated on: Aug 07, 2020 | 10:17 PM

मिरा भाईंदर : भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री अनुपमा पाठक (40) हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मिरारोडमधील काशीमिरा परिसरात म्हाडा बिल्डिंगमधील राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येच्या एक दिवसाआधी तिने फेसबुकवर लाईव्हही केलं होतं. तिच्या आत्महत्येप्रकरणी काशीमिरा पोलिसांनी कलम 360 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे. (Bhojpuri Actress Anupama Pathak Suicide)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुपमा पाठक ही भोजपुरी प्रसिद्ध अभिनेत्री  आहे. ती मिरारोडमधील काशीमिरा परिसरात म्हाडा इमारतीतील खोली क्रमांक 1802 मध्ये राहत होती. तिने 1 ऑगस्टला ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी तिच्या शेजारी राहणाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

अनुपमा यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी मनीष झा नावाच्या एका व्यक्तीचे नाव आहे. त्यासोबतच एका विसड्म प्रोड्यूसर कंपनीचे नाव लिहिले आहे. त्यावरुन पोलिसांनी आयपीसीची कलम 306 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. याबाबतचा पुढील तपास काशीमिरा पोलीस करत आहेत.

अनुपमा यांनी आपल्या फेसबुकवर लाईव्हदरम्यान आत्महत्या केली. अनुपमा पाठक हिने आपली अॅक्टिव्हा गाडी लॉकडाऊनच्या काळात तिने गावाकडे जाताना आपल्या मित्राला दिली होती. मात्र परत आल्यानंतर त्यांनी गाडी देण्यास नकार दिला. त्याशिवाय तिने विसडम प्रोड्युसर कंपनीकडे गुंतवलेले पैसे 2019 मध्ये परत मिळायचे होते.

मात्र ते भेटले नाहीत म्हणून अडचणीत होते. हाताचे काम गेले. तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून तिने आत्महत्या केली असे बोलले जात आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  (Bhojpuri Actress Anupama Pathak Suicide)

संबंधित बातम्या : 

कॅमेरा सेट करुन फेसबुक लाईव्ह, पंख्याला दोरी बांधून आत्महत्या

पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या, नांदगाव हादरले

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.